नांदेड(प्रतिनिधी)-जगात ईमानदारी संपली असा एक समज सर्वत्र आहे. म्हणून प्रत्येक जण जगाची ओळख करून घेतांना जरा संशयी नजरेनेच पाहतो. हे करत असतांना कधी-कधी आम्ही चांगल्या माणसांवर सुध्दा संशय घेतो. परंतू या जगात चांगली माणसे आहेत आणि त्यांची दखल घेणे आम्ही जबाबदारी आहे. आज लग्नात परत जाणाऱ्या एका महिलेची अडीच लाख रुपयांचा ऐवज असलेली बॅग खाली पडल्यानंतर ती बॅग ज्या व्यक्तीला सापडली त्याने ती बॅग त्या महिलेला पोलीस ठाणे अर्धापूरच्या आवारात परत दिली तेंव्हा ज्या महिलेची बॅग हरवली होती. ती आश्रु थांबत नव्हते. परंतू ते आश्रु नक्कीच आनंदाचे होते.
अर्धापूर जवळच्या लोण गावात नांदेड येथील महिला माया मिलिंद बुक्तरे या लग्नासाठी गेल्या होत्या. लग्न संपल्यानंतर दुपारी 3 ते 4 वाजेच्यासुमारास त्या परत येत असतांना त्यांनी आपला सोन्याचा ऐवज आपल्या हॅंड बॅगमध्ये ठेवल्या आणि लोण ते अर्धापूर प्रवास करत असतांना ती बॅग त्यांच्याकडून रस्त्यावर पडली. त्यावेळी गंगाधर नंदीअप्पा धुसे रा.बारसगाव हे व्यक्ती आपली काही तरी तक्रार देण्यासाठी अर्धापूर पोलीस ठाण्याकडे येत असतांना लोण शिवारात त्यांना ती बॅग दिसली. त्यांनी ती बॅग उचलून पाहिली असता त्यामध्ये सोन्याचा ऐवज होता.
आपल्याला सापडलेली बॅग गंगाधर धुसे यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवली आणि ते अर्धापूर पोलीस ठाण्यात आले असतांना माया बुक्तरे आकांत करत होत्या. गंगाधर धुसे यांनी विचारणा केली असता माझी बॅग हरवली आहे. त्यामध्ये सोन्याचा नेक्लेस आणि दोन अंगठ्या आहेत असे सांगितले. गंगाधर धुसे यांनी माया बुक्तरे यांना सापडलेल्या बॅगच्या खुना विचारून खात्री करून घेतली की, बॅग माया बुक्तरे यांचीच आहे. तेंव्हा गंगाधर धुसे यांनी ती बॅग महिलेला परत दिली. माया बुक्तरेचा आकांत यानंतर आनंदात बदला. परंतू तीच्या डोळ्यातील आश्रु थांबत नव्हते आणि ती गंगाधर धुसे यांना जे धन्यवाद देत होती. ते धन्यवाद गंगाधर धुसे कोणाला अडीच लाख रुपये देतील तरी तो देणार नाही असे होते. आजही इमानदारी शिल्लक आहे म्हणूनच गंगाधर धुसे यांना सामाजिक दृष्टीकोणातून आम्ही सुध्दा वास्तव न्युज लाईव्हच्या वतीने धन्यवाद देत आहोत.
