नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस उप निरीक्षक भगवान सावंत यांचे अपघाती निधन झाले आहे. रात्री ८.३० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदार गोविंद काळबा बोईनवाड यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर आज ढाकणी ता.लोहा येथे अंतिमसंस्कार करण्यात आले.
पोलीस उप निरीक्षक भगवान सखाराम सावंत यांचे अपघाती निधन आहे.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी किरण,जावई प्रविण गव्हाणे,भाऊ ईश्वर संवत, पांडुरंग सावंत, पुतणे – पुतणी असा मोठा परिवार आहे,त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरुन,महावीर नगर येथून आज रात्री ८.३० वाजता निघून गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार होतील.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील मुख्यालय येथे कार्यरत पोलीस अंमलदार गोविंद काळबा बोईनवाड यांचे 28 मे 2025 रोजी निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दि.29 मे रोजी मौजे ढाकणी ता.लोहा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात परिवार आहे.
