नांदेड(प्रतिनिधी)-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेडमध्ये येवून नांदेडचे सुपूत्र कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांचा अपमान अशोक चव्हाण यांच्यासमोर केला. त्यांच्या बोलण्याचा अर्थ या पेक्षा दुसरा असूच शकत नाही असे मत महाराष्ट्र कॉंगे्रसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
नांदेडमध्ये आज जय हिंद तिरंगा रॅलीसाठी कॉंगे्रसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आले होते. रॅली संपल्यानंतर ते पत्रकारांशी चर्चा करत होते. यावेळी नांदेडमध्ये 26 मे रोजी झालेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेबद्दल बोलतांना सांगितले की, कॉंग्रेसच्या काळात अनेक चुकीच्या गोष्टी होत होत्या. याचा अर्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्राचे गृहमंत्री, रक्षामंत्री, नियोजन समितीचे उपाध्यक्ष सन्माननिय डॉ.शंकरराव चव्हाण यांचे काम वाईट होते. असाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ आहे. कारण सध्याचे गृहमंत्रालय काय करते यांचे खुप मोठे महिमामंडन अमित शाह यांनी केले. नांदेडमध्ये येवून नांदेडचे सुपूत्र डॉ.शंकररावजी चव्हाण यांचा अपमान त्यांचे सुपूत्र खा.अशोक चव्हाण यांच्या समोर अमित शाह यांनी केला असल्याचे मत हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले.
आज जयहिंद तिरंगा रॅलीसाठी हर्षवर्धन सपकाळ हे नांदेडमध्ये आले होते. 21 मे रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आपले बलिदान दिले होते आणि त्या दिवसापासून तिरंगा रॅलीचे आयोजन राज्यभर करणे सुरू आहे. जय जवान या नाऱ्याला अनुसरून भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदुरमध्ये जरा याद करो कुर्बानी या अनुशंगाने आम्ही सैन्याचा सन्मान करण्यासाठी तसेच जय जवान या शब्दाला अनुसरून शेतकऱ्यांवर आलेल्या आसमानी आणि सुल्तानी संकटांच्या विषयी या रॅलीचे आयोजन केले आहे. एमएसपी योग्य मिळत नाही. तुर शेतात असतांना त्याचा दर 12 हजार रुपये होता आणि ती विकण्यासाठी आले तेंव्हा 6 हजार रुपये झाला. कारण ऑस्ट्रेलियातून महाग किंमतीत आणि मोठ्या संख्येत तुर मागविण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेताच्या मशागतीत येणाऱ्या खर्चाच्या दिडपट पैसे देवू असे सांगितले होते. पण काहीच मिळाले नाही. आमच्या रॅलीतील विषय राजकीय न ठेवता सामाजिक केला आहे. केंद्र आणि राज्य या दोन्ही जागी निवडूण आल्यावर सुध्दा शासन दंगल घडविण्याचा प्रयत्न केला आहे. दोन समाजात विष पसरवून हा प्रयत्न सुरू आहे. अशोक चव्हाण गेले काही आपल्या हितचिंतकांना घेवून गेले. परंतू नांदेड जिल्ह्याची जनता आणि कॉंगे्रसचा सर्वसामान्य कार्यकर्ता कॉंगे्रस सोबतच आहे. याचे उत्तर हर्षवर्धन सपकाळ यांनी खा.राजेंद्र चव्हाण यांचा विजय असे दिले. येणाऱ्या काळात खा.राजेंद्र चव्हाण हे कॉंगे्रसचे गत वैभव प्राप्त करून देतील अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त केली.
लोकशाहीचे संवर्धन करणाऱ्या लोकांसोबत आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढविणार आहोत हे सांगतांना स्थानिक स्तरावर कोणासोबत युती करायची याचे अधिकार स्थानिक नेत्यांना असतील असे सुध्दा हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत खा.राजेंद्र चव्हाण, हनुमंत पाटील बेटमोगरेकर, अब्दुल सत्तार, शाम दरक, महेश देशमुख, मुन्तजिबोद्दीन यांच्यासह कॉंगे्रस अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित शाह यांनी नांदेडमध्ये येवून सन्माननिय डॉ.शंकरराव चव्हाण यांचा अपमान केला-हर्षवर्धन सपकाळ
