राष्ट्रवादीचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन; पानभोसी येथे आज अंत्यविधी

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हयाच्या राजकारणात साडे तीन-चार दशके सक्रीय असलेले राज्य गृह व वित महामंडळाचे माजी अध्यक्ष व संचालक
जिल्हा बॅंकेचे विद्यमान उपाध्य्क्ष, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, या व अशा विविध पदावर राहिलेले प्रचंड लोकसंग्रह असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिहरराव विश्वनाथअप्पा भोसीकर यांची दीर्घ आजाराने वयाच्या 70 व्या वर्षी आज दि 27 रोज मंगळवारी निधन झाले. पानभोसी ता कंधार येथे दि. 28 रोज बुधवार सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, 1980 मध्ये कंधार तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालक पदापासून झाली हरिहरराव भोसीकर यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, कृषी व पशुसंवर्धन सभापती, तसेच राज्याच्या गृह व वित महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांनी तीन वेळा जिल्हा मध्यवर्ती सहकारी उपाध्यक्ष पद भूषविले. संपूर्ण जिल्हयात त्यांच्या कार्याची ओळख होती. देशाचे माजी गृहमंत्री डॉक्टर शंकरराव चव्हाण,याच्या सोबत त्यांनी सुरुवातीला काम केले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विश्वासू म्हणून ते परिचित होते. प्रतापराव – हरिहरराव ही जोडगोळी नव्वदच्या दशकात जि.प. मध्ये प्रसिद्ध होती.कुंटुरकर गोरठेकर – टाकळीकर – यांच्या भोसीकर होते मित्रभाषी व मोठा लोकसंग्रह आणि कामाचा प्रचंड उरक असलेले हरिहरराव भोसीकर याचे राजकीय कारकीर्द मध्ये चढ उतार आके शेवटच्या टप्प्यात आजारामुळे त्याचा संपर्क कमी झाला पण पक्ष कार्य सुरूच होते.मंगळवार 27 मे रोजी सकाळी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा शिवकुमार , बाळासाहे व नितीन हे तीन मुले स्नूषा, नानु भाऊ, पुतणे, भावत्र्यी असा परिवार आहे त्यांच्या निधनामुळे लोहा- केधार तालुक्याची मोठी राजकीय हानी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!