नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातील आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुखविंदरसिंह यांनी राज्यभरातील 1546 पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या दिल्या आहेत. त्यात पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षक, पोलीस उपनिरिक्षक, राखीव पोलीस निरिक्षक आणि राखीव पोलीस उपनिरिक्षकांचा समावेश आहे. याबदल्यांमध्ये काही जणांना एक वर्षाची मुदत वाढ देण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या बदल्यांमध्ये विहित कालावधी पुर्ण केलेल्या 249 आणि विनंतीनुसार 121 पोलीस निरिक्षकांचा समावेश आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षकांमध्ये विहित कालावधी पुर्ण करणारे 429 आणि विनंती 74 जण आहेत. पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्यांमध्ये 556 जणांचा समावेश आहे. राखीव पोलीस निरिक्षकांचा बदल्यामध्ये 34 जणांची नावे आहेत. राखीव पोलीस उपनिरिक्षकांच्या बदल्यामध्ये 83 जणंाचा समावेश आहे. असे एकूण 1546 जणांना बदल्या मिळाल्या आहेत.
या बदल्यांच्या सर्व पीडीएफ संचिका आम्ही वाचकांच्या सोयीसाठी जोडल्या आहेत.
राज्यभरात 1546 पोलीस अधिकाऱ्यांना बदल्या
