नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पथकाने 20 मे रोजी केलेल्या वाळू घाट कार्यवाहीच्या संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. रेती माफीयांनी पथकाला दिलेली रक्कम आकडेवारीनुसार विश्र्वसनिय सुत्रांनी सांगितली आहे. या कार्यवाहीच्या माध्यमातून स्थानिक गुन्हा शाखेने “अंडर फोर्टीन’ मध्ये मॅच फिक्सींग केली असून ही रक्कम 6 अंकी असल्याची माहिती आहे.
उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळी घाटावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने धडाकेबाज कार्यवाही करत कोट्यावधींचे साहित्य जप्त केले. परंतू या कार्यवाही दरम्यान दोन हायवा व चार बोटी पध्दतशिरपणे गुन्ह्यातून बाहेर टाकत लाखोची तोडीपाणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा नवीन माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने गोणेवार, उबाळे, संभाजी या नावांच्या व्यक्तींकडून तीन फायबर बोटीसाठी प्रत्येकी तीन आणि दोन हायवा वाहनांसाठी पाच अशी रक्कम घेतली आहे. ही रक्कम तीन नव्हे, चार नव्हे तर पाच अंकी असल्याचे सांगण्यात आले. सोबतच एका अनोळखी रेती माफीयांकडून देखी रक्कम घेण्यात आली होती. याचा तपशील मात्र मिळू शकला नाही.
स्थानिक गुन्हा शाखेने 20 मे रोजी केलेली कार्यवाही चांगलीच चर्चेत आली आहे. जिल्हा पोलीस दल रेती उपसा, वाहतुकीवर करत असलेल्या कार्यवाह्या, रेती वाहतुकीवर लगाम राहण्यासाठी आहेत का आर्थिक तडजोड करण्यासाठी आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे. 20 मे रोजी सोडून देण्यात आलेल्या दोन हायवा पुन्हा जप्त करणार आहेत काय? असाही प्रश्न विचारला जात आहे.
साभार: सोलापूर तरुण भारत दि.24 मे 2025.
मॅच फिक्सींग इन “अंडर फोर्टीन’
