नांदेड– मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी निर्गमीत केले आहेत.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे सोमवार 26 मे रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत. बाजाराच्या या भागात मोठया प्रमाणात दुकाने लागुन खरेदी विक्रीसाठी मोठया प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामुळे वाहतुक मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मौ. सांगवी बु. येथील सोमवार 26 मे रोजीचा नियोजित आठवडी बाजार बंद राहणार आहे. हा आठवडी बाजार दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार 27 मे 2025 रोजी भरवण्याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांनी मार्केट अँड फेअर अॅक्ट 1862 चे कलम 5 प्रमाणे निर्गमीत केले आहेत.
