नांदेड(प्रतिनिधी)-पायी जाणाऱ्या एका गृहणीच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण 19 ग्रॅम वजनाचे मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी तोडून पळून गेले आहेत. या 19 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 52 हजार आहे.
संस्कृती संत्तोष गडेकर या भावसारनगरकडे राहणाऱ्या महिला 23 मे रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास डी.मार्टमधून काही साहित्य खरेदी करून स्वागतनगर जवळ पायी चालत आल्या असतांना दोन चोरटे मोटारसायकलवर आले आणि पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 19 ग्रॅम वजनाचे मिनीगंठन तोडून पळून गेले. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 296/2025 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस अंमलदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.
महिलेचे 1 लाख 52 हजारांचे गंठण तोडले
