नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने येळी घाटावरील वाळूच्या कार्यवाहीतील दोन हायवा आणि चार बोटी गायब केल्याचे वृत्त प्रकाशित झाले. या वृत्ताच्या मागोवा घेतला असतांना उस्माननगर पोलीस ठाण्याच्या माजी प्रभारी अधिकाऱ्याने हे सर्व करायला भाग पाडल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटगाव, येळी, चिंचोळी येथे मोठी कार्यवाही केल्याची मोठी प्रेसनोट काढली होती. त्यामध्ये 2 कोटी 58 लाख रुपयांचे साहित्य जप्त केल्याचे लिहिलेले होते. ही कार्यवाही खरी पोलीसींग होती की, देखावा होता. यावर विचार केला तेंव्हा हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 ए.डी.2669 आणि टिप्पर क्रमांक एम.एच.12 ई.एफ 7684 या दोन जप्त केल्या. सोबतच हायवा क्रमांक एम.एच.26 बी.ई.3790 आणि टी.जी.17 टी.0128 या सोडण्यात आल्या. जप्त न केलेली ही दोन्ही वाहने दिवसभर वाळू घाटावर होती. तसेच वाळू काढणाऱ्या चार बोटी जप्तीमध्ये न दाखविता त्यांना पाण्यात बुढविण्यात आले. पोलीसांनी प्रसिध्दीसाठी पाठविलेल्या पत्रकातच आरोपींची नावे नव्हती. परंतू साहित्य जप्तीची आकडेवारी होती. या सर्व प्रकरणामध्ये जवळपास 500 ते 1000 मोदकांचा प्रसाद घेण्यात आल्याची चर्चा आहे. सोबतच राजकीय दबाव तर असतोच. ते पोलीस नेहमीच करतात. पण कोण चौकशी करील या प्रकरणाची कारण या प्रकरणाचा हा मोदक खेळ उस्माननगरच्या एका माजी प्रभारी पोलीस अधिकाऱ्याने केल्याची चर्चा पोलीस दलातील लोक करत आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेने केलेल्या कार्यवाहीतील बोटी माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मध्यस्थीने गायब झाल्या
