भारतीय सैन्यापुढे देशातील 140 कोटी लोक नतमस्तक होते, आहेत आणि राहतील. परंतू भारतीय वायुरक्षा महानिदेशक लेफ्टनंड जनरल सुमेध इवान द कुन्हा यांनी पॉडकास्टमध्ये दिलेल्या एका मुलाखतीमुळे नवीनच विषय जनतेसमोर आले आहेत. त्यामुळे भारतीय सैन्यात सुध्दा राजकारणाचा प्रवेश झाला अशी शंका यायला लागली आहे. आजपर्यंत भारतीय सैन्याने दोन युध्द जिंकले. सर्जिकल स्ट्राईक केला. एअर स्ट्राईक केला, कारगिल जिंकले. परंतू कधीच सैन्याने याची प्रसिध्दी केलेली नाही. मग आज का होत आहे प्रसिध्दी आणि ती सुध्दा भारतीय जनता पार्टी करते त्याप्रमाणे याचा अनुभव अमृतसर येथील श्री हरमिंदरसाहिबचे मुख्य ग्रंथी ग्यानी रघुविंदरसिंघ यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे आला आहे. ग्यानी रघुविंदरसिंघ यांनी सांगितले की, जे काही बोलले जात आहे ते खोटे आहे.

काय बोलले जात आहे. तर भारतीय वायुरक्षा महानिदेशक लेफ्टनंड जनरल सुमेध इवान द कुन्हा यांनी दिलेल्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की, आमच्या माहितीप्रमाणे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरावर ड्रोन किंवा मिसाईलने पाकिस्तान हल्ला करेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी ऍन्टी एअर गन आणि मिसाईल तैनात ठेवले होेते आणि त्यासाठी परवानगी पण घेतलेली होती. याबाबत एसजीपीसी (शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी) यांनी अशी परवानगी सैन्याला देण्यात आली नव्हती असे सांगून एक विचार समोर आणला आहे की, भारतीय सैन्य का खोटे बोलत आहे. ग्रंथी ग्यानी अमरजितसिंघ यांच्याद्वारे एसजीपीसीने दिलेल्या वक्तव्याप्रमाणे सैन्याला ऍन्टी एअर गण लावण्याची परवानगी दिली होती हे म्हणणे बरोबर नाही आणि सैन्याचे तसे काही केलेले नाही. परंतू ब्लॅकआऊटदरम्यान गुरुद्वारा प्रशासनाने परिसरातील दर्शनी भागातील आणि उंच जागेवर लावण्यात आलेले लाईट बंद करून प्रशासनाला सहकार्य केले होते. परंतू धार्मिक कार्य ज्या ठिकाणी सुरू असते. तेथील दिवा मात्र सुरूच होता. संपुर्ण धार्मिक कार्य पुर्ण करण्यात आले. कुन्हा यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, सुवर्ण मंदिराच्या अधिकाऱ्यांना धोक्याची सुचना असल्याची अशंका आम्हाला आहे असे आम्ही त्यांना सांगितले आणि म्हणूनच बंदुका तैनात करण्याची परवानगी त्यांनी दिली. तसेच सुवर्ण मंदिराचे लाईट बंद केले. कारण पाकिस्तानने पाठविलेला ड्रोन आम्हाला स्पष्टपणे दिसावा. पण सैन्य अधिकारी असा दावा का करत आहेत. हा आश्चर्य कारक प्रकार असल्याचे ग्यानी अमरजितसिंघ सांगतात. एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदरसिंघ धामी म्हणाले सैन्यासोबत कोणत्याही समन्वयाचा प्रकार झालेला नाही. फक्त ब्लॅकआऊटदरम्यान प्रोटोकॉलप्रमाणे सहकार्य करण्याचे सांगितले होते आणि आम्ही ते केले. धामी यांच्या म्हणण्याप्रमाणे तेथे ऍन्टी एअर गन तैनात केले असतील तर त्या भाविकांनी सुध्दा पाहिल्या असत्या.
विचारले जाणारे प्रश्न भारतीय राजकीय व्यक्तींना आहेत. विशेष करून सत्ताधाऱ्यांना आहेत. परंतू सैन्य त्याचे उत्तर का देत आहे. हा मोठा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर वेगवेगळ्या पध्दतीने अर्थात अगोदर ट्रॅम्प मग पाकिस्तानचे युनूस आणि त्यानंतर भारतीय विदेश सचिव आणि दोन महिला अधिकाऱ्यांनी युध्द विरामाची घोषणा केली. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. भारत सरकार म्हणाले त्यांची विनंती आली आणि आम्ही मान्य केले. त्यानंतर ट्रम्प पुन्हा म्हणाले व्यापार बंदची धमकी देवून मी युध्द विराम घडविला. त्यानंतर भारत सरकारने मान्य केले की, 7 ते 10 मे दरम्यान अमेरिकेशी चर्चा झाली. पण त्यात व्यापार शब्द नव्हता. मग चर्चा काय झाली, कोणती होती ती चर्चा याही पुढे डोनॉल्ड ट्रम्प सांगतात. युध्द विराम मी घडविला आणि मला श्रेय दिले जात नाही. भारत सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेश मंत्री एस.जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगावे की, ट्रम्प का खोटे बोलत आहेत. पण ते काही सांगत नाही. म्हणजे डाळीमध्ये काही तरी काळे आहे.

भारताने दोन युध्द जिंकले, एक सर्जिकल स्ट्राईक केला, एक एअर स्ट्राईक केले, कारगिल जिंकले तरी पण कधी प्रसिध्दी केली नाही. ऑपरेशन सिंदूर नंतर सैन्याची भाषा राजनितीक झाली आहे. ही बाब अत्यंत दुर्देवी असल्याचे वाटते. सरकार संसदेचे विशेष सत्र का बोलवत नाही. जेणे करून विरोधी पक्ष आणि भारतीय जनता यांना ऑपरेशन सिंदूरचे उत्तर देता येईल. परंतू सैन्य आपली गाथा सांगत का उत्तरे देत आहे. हा प्रश्न सर्वात मोठा आहे. सैन्याने कोठे मिसाईल तैनात केल्याही असतील, गुप्तरितीने केल्या असतील. तरीपण ती बाब सार्वजनिक करायची नाही. किंवा भारतीय जनतेला त्या तैनातीशी काही घेणे देणे नाही. दिल्ली, पंजाब, हरीयाना, राजस्थान या सर्वच ठिकाणी जनता आरामाने झोपली होती. कारण त्यांना आपल्या सैन्यावर विश्र्वास होता. म्हणूनच भारतीय नागरीकांनी सैन्याला कधीच प्रश्न विचारलेला नाही. मग सैन्य का आपले व्हिडीओ दाखवत आहे. भारतीय जनतेचा तर सैन्याला सॅल्युट आहे आणि तो कायम असणार आहे. पण नवीन नवीन मुलाखती देवून नवीन नवीन मुद्दे जनतेसमोर येत आहेत आणि ते सुध्दा सैन्याच्यावतीने ही अत्यंत खेदजनक बाब आहे. सोफीया कुरेशीच्या माध्यमातून हिंदु-मुस्लिम हे विष पसरविण्याचा सुध्दा प्रयत्न झाला आणि आता सुवर्ण मंदिराचे नाव घेण्यात आले आहे. जेथे संपुर्ण भारतीयांची आणि जगातील लोकांची श्रध्दा आहे. हा प्रकार म्हणजे, “आ बैल मुझे मार’ असा आहे.

