माजी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या अध्यक्षा विद्याताई जाधव यांना ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

नांदेड : महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलिस महानिरीक्षक तथा नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विठ्ठलराव जाधव व शांतिदूत परिवारच्या संस्थापक अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव या दाम्पत्याचा ‘ग्लोबल एक्सलन्स’ पुरस्काराने नुकताच सन्मान करण्यात आला.

 

पणजी (गोवा) येथील फर्न कदंबा येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान जाधव दाम्पत्याचा शाल, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, पदक व वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड इंग्लंड या संस्थेची स्मरणिका देऊन गौरव करण्यात आला. अभिनेते करण मेहरा, संस्थेचे अध्यक्ष मनीषकुमार, उपाध्यक्ष डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करत सत्कार करण्यात आला. या वेळी अभिनेत्री हिमानी शिवपुरी, अभिनेते सचिन पारीख, हितेश भारद्वाज, निखिलेश राठोड, अक्षदा मुदगल, रूपाली शर्मा, सुशील पराशर, हनीफ, अस्लम, पत्रकार अमित त्यागी व देशाच्या विविध भागातील पुरस्कारार्थी व शांतीदूत परिवार पुणे अध्यक्षा रोहिनी कोळेकर, मधू चौधरी, शीतल चौधरी आदी उपस्थित होते. शांतिदूत परिवार चे नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे, नानक साई फाऊंडेशन च्या जनरल सेक्रेटरी सौ प्रफुल्ला बोकारे पाटील,पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक, अधिकारी व मित्र परिवारासह अनेकांनी जाधव दाम्पत्य व शांतिदूत परिवाराचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!