एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगारांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

नांदेड : -राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सहआयुक्त (अं व द) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क मुंबई, विभागीय उपआयुक्त नांदेड विभाग बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अतुल कानडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार मंगळवार 20 मे रोजी रमेश लक्ष्मण गड्डमवार व रामदास जालमसिंग येरवाळ यांना स्थानबध्द केले आहे.

मुदखेड येथील रमेश लक्ष्मण गड्डमवार (वय 51 वर्षे) हा वारंवार क्लोरल हायड्रेट हे घातक रसायन मिश्रित बनावट ताडी विक्री करताना आढळून आला होता. या इसमाकडून महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीय दंडाधिकारी भोकर यांनी एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते. तरी या इसमाने त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न आणता वारंवार क्लोरल हायड्रेट हे घातक रसायन मिश्रित बनावट ताडी विक्री करीत असल्याने त्याच्या विरुध्द अनेक गुन्हे नोंद केले आहेत. त्याअनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भोकर यांनी या कार्यालयामार्फत सादर केलेल्या एमपीडीए प्रस्तावास जिल्हाधिकारी नांदेड यांनी 20 मे 2025 रोजी मान्यता देवून स्थानबध्दतेचे आदेश पारित केले. या आदेशानुसार या इसमाची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

किनवट तालुक्यातील बोधडी येथील रामदास जालमसिंग येरवाळ (वय-35 वर्षे) हा वारंवार अवैध हातभट्टी दारु निर्मिती, विक्री करतांना आढळून आला होता. या इसमाकडून महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत उपविभागीयदं डाधिकारी किनवट यांनी एका वर्षाच्या कालावधीकरिता चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले होते. तरी ही या इसमाने त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न-आणता वारंवार अवैध हातभट्टी दारुनिर्मिती, विक्री करित असल्याने त्याच्या विरुध्द अनेक गुन्हे नोंद केले आहेत. त्याअनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क किनवट यांनी या कार्यालयामार्फत सादर केलेल्या एमपीडीए प्रस्तावास जिल्हाधिकारी नांदेड यांनी 20 मे 2025 रोजी मान्यता देवून स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.

त्यानुसार सदर आदेशानुसार या इसमाची छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची शिक्षा अथवा दंडाची भिती नसणाऱ्या अवैध मद्य व्यवहारातील आरोपींना याव्दारे सक्त ताकीद देण्यात येते की, वारंवार गुन्हा करून अथवा महाराष्ट्र दारुबंदी गुन्ह्याच्या कलम 93 अंतर्गत घेण्यात आलेल्या बंधपत्राचे उल्लंधन केल्यास किंवा कुठल्याही प्रकारचे अवैध मद्यविक्री केल्यास त्यांची ही रवानगी वरीलप्रमाणे MPDA प्रस्ताव दाखल करून थेट कारागृहात करण्यात येईल.

या कारवाईत निरीक्षक, जावेद कुरेशी, दु.निरीक्षक रामप्रसाद पवार, अमित आढळकर, बळीराम इथ्थर, शिवदास कुबडे, स.दु.नि. मो.रफी, जवान विकास नागमवाड, अरविंद जाधव, निशिकांत भोकरे, श्रीमती धनश्री टेंभुर्णे, अमोल राठोड, ज.नि.वा. यांचा सहभाग असून स.दु.नि. बालाजी पवार यांनी या कारवाईसाठी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!