शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली सात्वंनपर भेट 

सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही           

नांदेड- देगलूर तालुक्यातील तमलूर या गावाचे भुमिपूत्र शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांच्या कुटूंबियाची राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज देगलूर येथील त्यांच्या घरी सात्वंनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी काळजी करु नका, शासन सदैव आपल्या पाठीशी असून, मी स्वत: लक्ष घालून सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधिक्षक अबिनाशक कुमार, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भरत सूर्यवंशी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे आदिची उपस्थिती होती.

देगलूर तालुक्यातील तमलूर या गावाचे भुमिपूत्र शहीद जवान सचिन यादवराव वनंजे यांचे 6 मे रोजी कर्तव्यावर असतांना मृत्यू झाला. भारतीय लष्करातील जवान सचिन यांचा मृत्यू ही अतिशय दुःखद घटना आहे. सचिन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांच्या पत्नीला व भावाला त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीसाठी योग्य ती मदत करण्यात येईल. तसेच त्यांना शासनाच्या योजनेच्या माध्यमातून पक्के घरकुल देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले.

त्यांच्या पेन्शनची कार्यवाही व शासनाकडून इतर सर्व देय मदत व लाभ वेळेत मिळतील यादृष्टीने मी स्वत: पाठपुरावा करीन असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत मदत त्वरीत मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री अतुल सावे यांनी केली. यावेळी त्यांनी त्यांचा एक महिन्याचा पगाराचा धनादेश शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटूंबियांना सुर्पूद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!