महाराष्ट्रात 1 नंबरचे चॅनेल असलेल्या प्रतिनिधीच्या नावावरच चाललाय धंदा
नांदेड(प्रतिनिधी)-उन्हाळा लोकांना घाम फोडत असतांना समुद्र किनारी दमट हवामानात चौफेर फिरत अंगाची लाही-लाही करून घेण्यामध्ये नांदेडच्या काही पत्रकारांनी आपला क्रमांक जोडला आहे. यासाठी मोदकांची सोय कोण केली होती. याचा शोध घेतला असता नव्यानेच लोकप्रतिनिधी झालेल्या पैकी कोणी तरी एक असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. लोकशाहीमध्ये कमलाचा हा खेळ मोठ्या चर्चेत आहे. सोबतच अनेक वर्ष ज्यांनी एका दगडाची पुजा केली त्या दगडाने सुध्दा त्यांना गरजेच्यावेळी मदत केली नाही हाही एक प्रसंग आम्हाला लिहावासा वाटतो.
सध्याच्या परिस्थितीत उन्हाळा जोरात आहे आणि अंगाची लाहीलाही अशीच होत आहे. परंतू काही बहाद्दर पत्रकारांनी या मौसमात सुध्दा समुद्र किनारी दमट हवामानाची सफर काढली. या सफरीला यशस्वी करण्यासाठी लोकशाहीमधील “कमल’चा मोठा हात आहे. सोबतच मोठ्या बॅनरची सुध्दा आवश्यकता होती. म्हणून शक्कल लढवण्यात आली. दिवसातून दहा वेळेस काही सेकंदात अर्धा शेकडा बातम्या दाखवणाऱ्या हिंगोली येथून नांदेडला कार्यरत झालेल्या प्रतिनिधीला सोबत घेण्यात आले आणि मोदक देणाऱ्याला भाऊजी हे नाव देवून मोदकांचा खेळ सुरू झाला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार 40 मोदक घेण्यात आले. त्यातील एकाला जायची इच्छा परिक्षेमुळे झाली नाही. म्हणून त्याने आपले दहा मोदक सुरक्षीत ठेवले. यामध्ये दुसरे दहा मोदक सुध्दा सुरक्षीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यात काही सेकंदात काही बातमीवाल्यांचे ते मोदक आहेत अशी माहिती प्राप्त झाली आहे. काय जबरदस्त सफर झाली असणार ना? उन्हाळा आग ओकतो आहे आणि सुमद्र किनारी आणि ते सुध्दा गोव्यासारख्या जगभरात नामांकित ठिकाणी दमट हवामानात सफर करून येणाऱ्या या पत्रकारांना शाब्बासच म्हणावे लागेल.
नांदेडमध्ये मीच शब्दांचा खेळ करतो असा आव आणणारे बरेच जण आहेत. त्यात संतांच्या गाथेतील शब्द ज्या ओळ्यांनी तयार होतात. ते नाव आपल्या घरावर लिहुन मृर्दुमकी गाजवत पत्रकार क्षेत्रात आज कोठेच किंमत नसणाऱ्या व्यक्तीला आपल्यासाठी देव समजून त्याची सर्वस्वी पुजा केलेल्या एका पत्रकाराला गरज पडली तेंव्हा त्याला हे आज कळले की, मी ज्याची पुजा केली तर तो देव नव्हताच तर तो दगड आहे. आपल्या व्यथा इतरांसोबत सांगतांना तो कोणाचे नाव घेत नाही पण तो दगड सगळ्यांना माहित आहे आणि तो दगड असल्यामुळेच आज कोणत्याच क्षेत्रात कोणीच त्याला किंमत देत नाही हे सुध्दा तेवढेच खरे आहे.
लोकशाहीमधील “कमल’ चा असाही प्रकार; ऑफीस मिटींगच्या नावाने लोकप्रतिनिधीकडून गोवा टुर
