नांदेड(प्रतिनिधी)-मौजे तळेगाव ता.तामसा येथे बाहेर झोपलेल्या महिलांचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले आहेत. त्यांची किंमत 1 लाख 19 हजार 700 रुपये आहे.
देवशाला आकाश बेलखेडे रा.अंबोडा ता.महागाव जि.यवतमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या आपल्या बहिणीच्या माहेरी तळेगाव येथे आल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम संपवून त्या बाहेरच झोपल्या. 17 मे रोजी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान त्यांच्या कानातील, गळ्याती, सोन्याचे दागिणे आणि लग्नासाठी आलेल्या दुसरे नातलग सोनाली मारोती हंबे, वर्षा श्रीराम घोडके यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे व पायातील चांदीचे जोडवे असा एकूण 1 लाख 19 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 90/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार पवार अधिक तपास करीत आहेत.
झोपलेल्या महिलांचे दागिणे चोरले
