नांदेड,(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील 27 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्याच्या आदेश गृह मंत्रालयातील सचिव वेंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत.
नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या आरती सिंह यांना पोलीस सह आयुक्त गुप्तवार्ता बृहन्मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई येथील प्रसाद अक्कानवरू यांना पोलीस उप महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. पुणे ग्रामीण येथील पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना अपर पोलीस आयुक्त पुणे शहर या पदावर नियुक्ती मिळाली आहे. पोलीस उपायुक्त प्रतिबंधक विभाग बृहन्मुंबई येथील अमोघ गावकर यांना पोलीस उपमहानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग प्रशासन पुणे येथे पाठवण्यात आले. आहे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील पोलीस व उप महानिरीक्षक जी. श्रीधर यांना पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथे पाठवण्यात आले. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८ मुंबई येथील समादेशक मोक्षदा पाटील यांना पोलीस उप महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ९ अमरावती येथील समादेशक राकेश कलासागर यांना पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई या पदावर पाठवण्यात आले आहे. त्यांच्यासाठी पद अवनत करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ नागपूर येथील समादेशक प्रियंका नारनवरे यांना अपर पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक महामार्ग सुरक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई येथील अरविंद साळवे यांना सहसंचालक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे जागा मिळाली आहे. मुख्य दक्षता अधिकारी सिडको नवी मुंबई येथील पोलिस अधीक्षक सुरेश कुमार मेंगडे यांना मुख्य दक्षता अधिकारी सिडको नवी मुंबई हे पद उन्नत करून देण्यात आले आहे. रत्नागिरी येथील पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना अपर पोलीस आयुक्त विशेष शाखा बृहन्मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथील विजय मगर यांना पोलीस महानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बलगट पुणे येथे पाठवण्यात आले आहे त्यांच्यासाठी हे पद अवनत करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक बिनतारी विभाग पुणे येथील राजेश बनसोडे यांना अपर पोलीस आयुक्त पुणे शहर हे पद देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण विक्रम देशमाने यांना अपर पोलीस आयुक्त मध्यप्रदेशिक विभाग बृहन्मुंबई या पदावर पाठवण्यात आले आहे.पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण ठाणे येथील राजेंद्र दाभाडे यांना अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर या पदावर नियुक्ती मिळाली आहे. पोलीस आयुक्त मध्यप्रदेशिक विभाग बृहन्मुंबई येथील अनिल पारसकर यांना अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई हे पद मिळाले आहे. अपर पोलीस आयुक्त गुन्हे पुणे शहर येथील शैलेश बलकवडे यांना अपर पोलीस आयुक्त गुन्हे बृहन्मुंबई या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त वाहतूक बृहन्मुंबई एम. राजकुमार यांना संचालक महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे पद अवनत करून नियुक्ती दिली आहे. बृहन्मुंबई येथील अपर पोलीस आयुक्त गुन्हे शशीकुमार मीना यांना अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग बृहन्मुंबई अशी नियुक्ती मिळाली आहे. अपर पोलीस आयुक्त दक्षिण पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर येथील प्रवीण पाटील यांना अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त गुन्हे नागपूर शहर येथील संजय पाटील यांना अपर पोलीस आयुक्त पुणे शहर येथे नियुक्ती मिळाली आहे. पिंपरी चिंचवड येथील अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांना अपर पोलीस आयुक्त नागपूर शहर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथील एस. डी. आव्हाड यांना अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड हे पद देण्यात आले आहे. दक्षिण प्रादेशिक विभाग नागपूर शहर येथील एस. टी. राठोड यांना पोलीस उपमहानिरीक्षक अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स या पदावर पाठविण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेशिक विभाग नागपूर शहर येथील प्रमोद शेवाळे यांना पोलीस उप महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे. अरविंद चावरिया अपर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर आहेत, त्यांना पोलीस आयुक्त अमरावती शहर हे पद अवनत करून नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण व सुरक्षा बृहन्मुंबई येथील विनिता साहू यांना अपर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस दल मुंबई येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
