नांदेड(प्रतिनिधी)-मौजे धामनदरी ता.किनवट येथे एका कुटूंबाचे लग्नात जाणे त्यांना महागात पडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी 5 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
जगदीश भास्कर जाधव रा.धामनदरी ता.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 14 मे रोजी सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान ते आपल्या घराला कुलूप लावून लग्नात गेले होते. या संधीचे सोने चोरट्यांनी केले. त्यांच्या घराचे कुलूप डुप्लीकेट चाबीने उघडून घरात प्रवेश केला आणि लोखंडी पेटीचे कुलूप कापून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे असा 5 लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. किनवट पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 146/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक मामीडवार अधिक तपास करीत आहेत.
किनवट तालुक्यातील धामनदरी गावात 5 लाख 80 हजारांची चोरी
