नांदेड(प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बॅंकेचे अध्यक्ष कमलकिशोर तावडे यांना पी.एच डी प्रदान.सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्या बद्दल अमेरिकेतील कोलंबिया ( कॅलिफोर्निया) विद्यापीठाची मानद डॉक्टरेट देण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातील तळणी सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेत सहकार क्षेत्रात काम करत व सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक कमलकिशोर तावडे हे गेल्या पंधरा वर्षा पासून सहकार क्षेत्रात काम करत आहेत.शहरापासून दूर असणाऱ्या तळणी सारख्या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात डॉ.कमलकिशोर तावडे यांचा जन्म झाला. तळणी याठिकाणी प्राथमिक शिक्षण आणि नंतर हदगाव व नांदेड याठिकाणी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन, कमलकिशोर तावडे यांनी पैनगंगा मल्टीस्टेट बॅंकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली. दरम्यान सहकार क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील खेड्यापाड्याची नाळ असणाऱ्या कमलकिशोर यांच्या पैनगंगा मल्टीस्टेट बॅंकेच्या जवळपास पंधरा शाखा आज मराठवाड्यात उत्तम रित्या कार्य करत असताना पहायला मिळतात. या माध्यमातून डॉ. कमलकिशोर तावडे यांनी सामाजिक भान ठेवत खेड्यापाड्यातील छोटेमोठे उद्योग, शेतकरी समूह, बचत गट, सुशिक्षित बेरोजगारांना,कुटीर उद्योगांना, अर्थसहाय्य करत स्वतः च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली.दरम्यान त्यांच्या या कामाची दखल समता प्रतिष्ठान दिल्लीने घेतली. त्यानुसार त्यांना सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आल.तर उद्योग आणि सहकार क्षेत्रातील उत्कृत योगदाना बद्दल अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाची पीएचडी पदवी त्यांना बहाल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा पैनगंगा मल्टीस्टेट बॅंकेचे अध्यक्ष कमलकिशोर तावडे यांना काल 11 मे 2025 रोजी मालवीय स्मृती भवन, नवी दिली याठिकाणी अशोकस्तंभाचे सन्मान चिन्ह आणि पीएच.डी. देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्या बद्दल अमेरिकेतील कोलंबिया (कॅलिफोर्निया) विद्यापीठाने ही मानद डॉक्टरेट डॉ.कमलकिशोर तावडे यांना बहाल केली आहे.
