नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी 12 मे च्या रात्री गस्त करत असताना 30 लाख रूपये किंमतीचा टिप्पर पकडून त्यात असलेली 25 हजार रूपये किंमतीची चोरटी वाळू सुद्धा जप्त केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील अंमलदाराने माधव डफडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि. 12 मे रोजी रात्री 10 वाजता बोंढार गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी टिप्पर क्र. एम.एच. 26 बीई 9727 ची तपासणी केली. यामध्ये चोरट्या पद्धतीची वाळू भरलेली होती. या वाळूची कागदपत्रे त्यांनी दिली नाहीत. तेव्हा गाडीचालक शिवानंद संभाजी पुयड रा. पुणेगाव ता.जि. नांदेड याच्याविरूद्ध गुन्हा क्र. 454/2025 दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार चाटे करीत आहे. पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार धम्मपाल कांबळे, शेख आसीफ आणि जमीर अहेमद यांनी ही कारवाई केली. 30 लाखांची टिप्पर गाडी आणि 25 हजारांची वाळू असा 30 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

