नांदेड(प्रतिनिधी)-माळटेकडी पाण्याच्या टाकीजवळ दोन जणांनी एका 19 वर्षीय युवकाला मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम असा 12 हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.
सागर संतोष नवघरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 मे रोजी पहाटे 3 वाजेच्यासुमारास माळटेकडी पाण्याच्या टाकीजवळ शेख नईम आणि सय्यद मोईन या दोघांनी त्याला पकडून डोक्यात, हातावर आणि पाठीवर मारून जखमी केले आणि सागर नवघरेचा 7 हजार रुपयांचा मोबईल आणि 5 हजार रुपये रोख रक्कम लुटून नेली आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 176/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक वाणी अधिक तपास करीत आहेत.
युवकाला मारहाण करून 12 हजारांची लुट
