नांदेड शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होण्याच्या त्रासावर उपायाची मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील विविध भागात सायंकाळच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या दुर्देवी प्रकारासाठी चौकशी करुन सेवेत असणाऱ्या त्रुटी पुर्ण कराव्यात अशी मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते गौतम जैन यांनी जिल्हाधिकारी नांदेड आणि महावितरण कार्यालयातील कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.
गौतम जैन यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे नांदेड शहरात सातत्याने वीज पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. विशेष करून संध्याकाळी व रात्रीच्यावेळेस वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक त्रास नागरीकांना होत आहेत. वादळ वारा हा एक शब्द सांगून महावितरण कंपनी त्यातून वाचण्याचा प्रयत्न करते. परंतू मे महिन्याच्या अगोदर वीज वितरण कंपनीला आपल्या विविध यंत्रणांची तपासणी करून पुर्तता करण्यासाठी भरपूर मोठा निधी मिळतो. मग वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत कसा होता. ही बाब खेदजनक आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या परिक्षेचे दिवस आहेत. तसेच घरात राहणाऱ्या वयस्कर व्यक्ती आणि लहान बालकांना यामुळे त्रास होत आहे. म्हणून वारंवार वीज पुरवठा खंडीत होणाऱ्या घटनेवर गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. वीज पुरवठा वारंवार कमी जास्त होत असल्यामुळे फ्रिज, संगणक, वायफायर राऊटर या सारखी उपकरणे बंद पडत आहेत. नांदेडमधील वीज खंडीत होण्याच्या सखोल आढावा घ्यावा. समस्येच्या मुळाशी जाऊन तात्काळ सुधारणा कराव्यात, क्षमतेनुसार ट्रान्सफार्मर व डी.पी.बदलून वीज यंत्रणा मजबुत करावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे. नाही तर नागरीकांच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असेही या अर्जात लिहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!