कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी दिली माहिती

नांदेड(प्रतिनिधी)-ऑपरेशन सिंदुर फक्त 25 मिनिटात पुर्ण करून आजही आम्ही छत्रपतींचा गनिमी कावा अंमलात आणतो हे भारतीय सैन्याने दाखवून दिले. 7 मे हा दिवस युध्दाच्या रंगीत तालीमीसाठी सुनिश्चित करून त्याची भरपूर प्रसिध्दी केली आणि 7 तारेखचा सुर्योदय होण्याअगोदरच रात्री 1 वाजून 5 मिनिट ते 1 वाजून 30 मिनिट अर्थात 25 मिनिटात हवाई ते जमीनीवर मार करणारे मिसाईल सोडून भारतीय हवाई सेनेने 9 अतिरेकी कॅम्प उध्वस्त केले आहेत. आजचा सुर्योदय होताच पाकिस्तानने भारताच्या नागरीकांवर काश्मिरमध्ये तोफगोळे टाकले आहेत. ज्यामध्ये 7 नागरीकांचा मृत्यू झाला आहे. यालाच ऍक्ट ऑफ वॉर म्हणतात. आम्ही केलेली कामगिरी ही आमच्या विरुध्द झालेल्या छुप्या कार्यवाहीचे उत्तर होते. ही माहिती भारतीय थलसेनेतील कर्नल सोफीया कुरेशी आणि हवाई दलातील विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मध्यरात्री भारताने अहमदाबाद येथील बंदरातून ही कार्यवाही सुरू केली आणि 25 मिनिटात कार्यवाही पुर्ण करून आपले विमान परत आले. याचे उत्तर देतांना पाकिस्तानने आमचे राफेल पाडले, सुखोई पाडले आणि सैन्य मुख्यालय उडवले अशा आफवा तयार केल्या. त्या आफवा त्यांनी सामाजिक संकेतस्थळांवर भारतीयांची नावे दिसतील अशा नावांनी फेक आयडी बनवून प्रसिध्द केल्या. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने जनतेला आवाहन आहे की, कोणत्याही फेक प्रसिध्दीवर विश्र्वास ठेवू नका. आपल्या देशातील प्रमाणित पध्दतीने प्रसारीत होणाऱ्या बातम्यांवरच विश्र्वास ठेवा. आम्ही आमच्या तिन्ही सैन्याला सलाम करून त्यांनी केलेली कार्यवाही कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांच्या शब्दात वाचकांसाठी मांडत आहोत.

दि.7 मे ही भारतात युध्दाची रंगीत तालीम होईल अशी प्रसिध्दी करण्यात आली. म्हणजे भारत 7 मे पर्यंत काहीच करणार नाही असा विश्र्वास पाकिस्तानला आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनीमीकाव्याप्रमाणे भारतीय सैन्याने 7 मेचा सुर्योदयच होवू दिला नाही. भारतीय थलसेना, नौसेना आणि हवाईसेना यांनी संयुक्तपणे या कार्यवाहीला प्रत्यक्षात आणले. भारताची राफेल, सुखोई ही विमाने 1 वाजून 5 मिनिटाला आकाशात झेपावली. सर्वात दुरचे टार्गेट 100 किलो मिटर होते बहावलपुर, त्यानंतर 35 किलो मिटरवर गुलपूर, 10 किलो मिटरवर बरनाला यासोबत सरजाल, महेमुना, कोटली, बिलाल, सवाई या ठिकाणी विमानांनी हॅमर या मिसाईल टाकल्या. त्यात हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा या तिन अतिरेकी संघटनांची प्रशिक्षण केंद्रे, अतिरेकी लॉंच पॅड स्थित आहेत. त्यांना सर्वस्वी नैस्तनाबुत करून भारतीय विमाने 25 मिनिटात परत आली आणि ऑपरेशन सिंदुर पुर्ण केले. पण आम्ही ऑपरेशन सिंदूर पुर्ण झाले असे म्हणणार नाही तर ऑपरेश सिंदुर सुरू आहे असे म्हणणार आहोत.

आज भारतीय सैन्याच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्नल सौफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिकासिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईचे अतिरेकी, कंधार विमान अपहरणाचे अतिरेकी, संसदेवरील हल्याचे अतिरेकी असे सर्वच अतिरेकी या भागातूनच तयार होवून आले होते. याचा सविस्तर ईतिहास सांगितला. बैसारन घाटी, पहलगाम येथे 25 भारतीय आणि एक नेपाळी नागरीक मारल्याची जबाबदारी लष्कर ए तैयबाची संघटना टीआरएफने घेतली होती. एक अतिरेकी मरण पावल्याची घोषणा करून पाकिस्तानने अंतरराष्ट्रीय दबावानंतर तो जीवंत असल्याचे सांगितले. हाच तर पाकिस्तानविरुध्द भक्कम पुरावा आहे. आमच्या देशात पाकिस्तान्यांनी हल्ले करून सर्वसामान्य लोकांना टार्गेट केले. त्याला प्रतिरोध करणे, त्याला अटकाव करणे, त्यांना रोखणे यासाठीच आम्ही हवाई हल्ले केले अशी माहिती भारतीय सैन्यातील दोन वाघींणींनी दिली.

भारतीय सैन्याच्या कार्यवाही उत्तरात रात्रभर पाकिस्तानच्या एलओसी व आयओसीजवळ फायरींग सुरू होती. 7 मेचा सुर्योदय झाल्यानंतर पाकिस्तानने पुंछ, अखनुर या कश्मिरच्या शहरांमध्ये सर्वसामान्य नागरीकांवर बॉम्ब हल्ले केले आहेत. त्यात मोहम्मद आदील शाहनुर, सलीम हुसेन अलताफ हुसेन दोघे रा. मेंढर आणि रुबीकौर शेल्लूसिंघ रा.मलकोट या तिघांसह एकूण 7 जणांचा त्या बॉम्ब हल्यात मृत्यू झाला आहे. जीनीव्हा कॅनव्हेशनप्रमाणे मानवतेच्या दृष्टीकोणातून पाकिस्तानची कार्यवाही चुकलेली आहे. या कॅनव्हेशनप्रमाणे सर्वसामान्य नागरीक, दवाखाने आणि शाळा यांना टार्गेट करता येत नाही. आपल्याच देशात सिया मुस्लिमांना ते मारुन टाकतात. इतर काही अनेक मुस्लिमांना ते मुस्लिम मानत नाहीत आणि आम्ही आतंकपिडीत आहोत असे पाकिस्तान दाखवते. परंतू खरे तर त्यांच्यामुळे इतर आतंकाने पिडीत झाले आहेत हे सत्य आहे. भारतीय सैन्याच्यावतीने माहिती देतांना सौफिया कुरेशी आणि व्योमिकासिंह यांनी सांगितले की, यापुढे सुध्दा भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कोणत्याही प्रतिक्रियेला भरपूर मोठे उत्तर देईल ज्याची किंमत पाकिस्तानला मोजावी लागेल.भारतीय विमानांनी अतिरेकी ठिकाणांवर टाकलेल्या बॉम्ब हल्यांचे चित्रीकरण सुध्दा पत्रकार परिषदेत दाखविण्यात आले. सध्याच्या परिस्थितीत भारतीय नागरीकांनी आपल्या बोलण्याने, आपल्या लिहिण्याने, आपल्या प्रतिक्रियांमुळे पाकिस्तानला काही संधी मिळेल असे काही आपल्या हातून घडू नये अशी विनंती सुध्दा वास्तव न्युज लाईव्ह भारतीय नागरीकांना करत आहे.






