नांदेड,(प्रतिनिधी )-बैसारन घाटी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची सुरुवात आजचा सूर्योदय होण्यापूर्वीच भारताने सुरु केलीय.पाकिस्तानच्या सीमेत न जाता भारताच्या सीमेतूनच हवाई ते जमीन मार करणाऱ्या हॅमर मिसाईल द्वारे नऊ ठिकाणी भारतीय विमानांनी हल्ला केला. 3 अतिरेकी संघटनांच्या 9 ठिकाणांवर भारतीय विमानांनी आपल्याच भागातून केलेला हल्ला प्रभावी ठरला आहे आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्या युद्ध होणार हा घटनाक्रम 22 एप्रिल नंतर सुरू झाला बैसारन घाटी पहेलगाम कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी 28 पर्यटकांना मारले आणि त्यानंतर पूर्ण देशात या विरुद्ध लहर उठली. या लहरीला कधी सुरुवात होईल असा भाव सुद्धा देशात तयार होत होता. दिनांक 7 मे रोजी युद्धाची रंगीत तालीम घेतली जाईल असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. परंतु भारतीय लष्कराने सात तारखेचा सूर्योदय होण्याअगोदरच सहा आणि सात मे च्या रात्रीच पाकिस्तानच्या भागात असणाऱ्या अतिरेकी संघटनांच्या नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे.
त्यामध्ये भारतापासून शंभर किलोमीटर दूर असणाऱ्या भागलपूर, पंजाब प्रांतातील मुदिरका, गुलपूर, सवाई, बिलाल कॅम्प, कोटली, सरजाल, मेहमुना कॅम्प आणि बरणाला कॅम्प या ठिकाणांवर हल्ला केला. यामध्ये तीन ठिकाण लष्करे ए तैयबाचे आहेत आणि इतर कॅम्प जैस ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनांचे आहेत. तीन संघटना नऊ जागा आणि ऑपरेशन सिंदूर सुरू झाले आहे. भारतात कश्मीर येथे पाकिस्तान हल्ला करेल म्हणून भारताची विमाने रात्रभर आणि आत्ता आम्ही बातमी प्रसारित करेपर्यंत सुद्धा गस्त घालत आहेत. भारतातील अनेक ठिकाणांवर विमानांचे येणे आणि जाणे बंद करण्यात आले आहे. राजस्थान, पंजाब या ठिकाणी सुद्धा सैन्य हाय अलर्ट वर आहे.
सहा आणि सात मे च्या मध्यरात्री भारताच्या सैन्याच्या तिन्ही विभागांनी मिळून हा हल्ला ज्यामध्ये रफेल विमानांना आणि मिराज 2000 या विमानांना पाकिस्तानच्या वायुसेनेत न जाताच त्यांना कोठे कोठे हल्ला करायचा आहे याचे टार्गेट देण्यात आले. ते टार्गेट विमानांनी पूर्ण केले क्रूस मिसाईल, इंडो फ्रेंच क्रूज मिसाईल अर्थात हॅमर या हत्याराचा वापर करण्यात आला.Notam काल रात्री जारी करण्यात आले होते याचा अर्थ नोटीस टू एअर मिशन असा होतो. रात्री आमच्या सैन्यांनी हा हल्ला पूर्ण केला. समुद्री सीमेतून हा हल्ला तयार करण्यात आला होता. त्याला सैनिक भाषेत सी बॉर्न अटॅक असे म्हणतात. झालेल्या हल्ल्यात पाकिस्तान मध्ये अनेक ठिकाणी आगी लागल्याचे चित्र सुद्धा प्राप्त झाले आहेत. दहा वाजेपर्यंत भारतीय सैन्याच्यावतीने सुद्धा या संदर्भाची पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात येईल पण आम्हाला प्राप्त झालेल्या माहितीला आम्ही वाचकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

