सन 2024-25 मधील विद्यार्थ्यानी बँक खात्याची माहिती संकेतस्थळावर भरण्याचे आवाहन नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 व 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासणी सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येत असून सदारच्या त्रुटीची हि शेवटची संधी देण्यात आलेली आहे. अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी https://www.syn.mahasamajkalyan.in संकेतस्थळावर भेट द्यावी. तसेच आपल्या अर्जातील त्रुटीची पूर्तता एसएमएस प्राप्त झाल्याच्या 13 मे 2025 या कालावधीत कार्यालयास सादर करावयाची आहेत, याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. तसेच सन 2024-25 मधील ज्या विद्यार्थ्यानी ऑनलाईन प्रणालीमार्फत बँक खाते चे सर्व माहिती https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ माहिती व्यवस्थीत भरावी जेणेकरून या वर्षीचा लाभ देणे सोयीचे होईल. तसेच सन 2023-24 मधील लाभार्थ्यानी https://www.syn.mahasamajkalyan.in ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीवर ज्या कागदपत्रांची पुर्तता केलेली आहे, त्याची प्रत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,518 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 7 आणि 8 मे रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती