नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी आणि लिंबगाव पोलीसांनी चोरट्या वाळूची वाहतुक करणाऱ्या दोन गाड्या पकडून 34 लाख 33 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि.6 मे रोजी मध्यरात्री 3 वाजेच्यासुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गस्त करत असतांना मामा चौकाजवळ त्यांनी हायवा गाडी क्रमांक एम.एच.26 सी.एच.1428 ची तपासणी केली. त्यामध्ये चोरटी विक्री करण्यासाठी वाळू भरलेली होती. याबाबत पोलीस अंमलदार विठ्ठल माधव भिसे यांच्या तक्रारीवरुन अंगद मधुकर येवले रा.जानापुरी ता.लोहा यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 432/2025 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शना पोलीस अंमलदार शेख जावेद, मुबीन, गायकवाड आदींनी ही कार्यवाही पुर्ण केली.

लिंबगाव पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार दत्तराम मााधवराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 मेच्या मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास सुगाव ते पावडेवाडी जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाजवळ त्यांनी वाहन क्रमांक एम.एच.06 ए.क्यु. 7095 ची तपासणी केली. त्यामध्ये चोरट्या पध्दतीची वाळू भरलेली होती. या प्रकरणात लिंबगाव पोलीस ठाण्यात विजय भास्कर ढगे (40) रा.धनगर टाकळी ता.पुर्णा जि.परभणी विरुध्द गुन्हा क्रमांक 59/2025 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधिक्षक डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शना लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनकर, पोलीस उपनिरिक्षक एन.एम. सय्यद, पोलीस अंमलदार काझी आणि दत्तराव शिंदे यांनी ही कार्यवाही पुर्ण केली. या दोन गाड्यांमधील वाळू आणि गाड्या असा एकूण 34 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल नांदेड ग्रामीण आणि लिंबगाव पोलीसांनी जप्त केला आहे.
