नांदेड: नांदेड येथील तरुण आणि प्रसिद्ध पत्रकार आणि “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनलचे संपादक मुबीन कामरानी यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते बऱ्याच दिवसापासून कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराने ग्रस्त होते आणि गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यावर नांदेड, हैदराबाद आणि मुंबई येथील विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले, परंतु आजारात कोणतीही लक्षणीय सुधारणा झाली नाही. गेल्या तीन ते चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथील शिवस श्वास रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर, सोमवार, ५ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, ६ मे रोजी ५ वाजता असरच्या नमाजानंतर गाडीपुरा येथील बडी दर्गा मशिदीत अदा करण्यात आली आणि त्याच्या शेजारील कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील शेकडो लोक उपस्थित होते. दिवंगत मुबीन कामरानी यांनी “मेरी आवाज न्यूज” या युट्यूब चॅनेलद्वारे अल्पावधीतच पत्रकारिता क्षेत्रात एक अनोखा ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने नांदेडच्या पत्रकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, पत्नी, आई वडील, पाच भाऊ, दोन बहिणी इत्यादींचा समावेश आहे.
More Related Articles
गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सर्व स्तरावर जनजागृती करा- जिल्हाधिकारी
14 वर्षांच्या मुलींच्या ‘एचपीव्ही’ लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन सज्ज ; शिक्षण विभागाच्या समन्वयाने प्रत्येक पात्र मुलीपर्यत…
पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचा भाजपचा प्रचार खोटा-ऍड. प्रकाश आंबेडकर
नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या कार्यवाहीने पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी पाकिस्तान तरसणार आहे हा भारतीय जनता पार्टीचा खोटा प्रचार आहे अशी…
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हिमालया बेबी फिडिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा
नांदेड – महिला सक्षमिकरण अंतर्गत स्तनपान करणाऱ्या महिलांना हक्काची जागा आणि समानतेची संधी उपलब्ध…
