हिमांशी नरवालला ट्रोल करण्यापेक्षा घाटीमध्ये जाऊन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्याची हिम्मत दाखवा

पहगामच्या बैसारन घाटीमध्ये अतिरेक्यांच्या हल्यात मरण पावलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांचा 1 मे रोजी वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांचे कुटूंबिय, त्यांच्या पत्नी हिमांशी आणि त्यांचे कुटूंबिय यांनी रक्तदान शिबिर कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात लेफ्टनंट विनय नरवाल अमर रहै अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी असंख्य पत्रकार उपस्थित होते आणि पत्रकारांनी हिमांशी नरवाल यांना गाठले. त्या म्हणाल्या. काश्मिरी किंवा मुस्लिम असे भांडण आम्हाला नको आहे. ज्यांनी ही घटना घडविली आहे. त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आणि आम्हाला शांतता हवी आहे. याचा अर्थ असा झाला विनय आणि हिमांशी यांचा फोटो कार्टूनमध्ये बदलून त्यावर धर्म पुछ कर मारा असे लिहिणाऱ्या द्वेषीलोकांप्रमाणे हिमांशी बोलत नाहीत. उलट असे बोलणाऱ्यांच्या तोंडावर त्यांनी चपराक दिली हे सहन न झालेल्या अनेक द्वेषी लोकांनी विरपत्नी असलेल्या हिमांशी यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा घाणेरडा प्रकार केला आहे.

18 एप्रिल रोजी लग्न आणि 22 एप्रिल रोजी विधवा असा मोठा बदल ज्या हिमांशी यांच्या जीवनात झाला. त्यांच्याबद्दल घणेरडे शब्द वापरून व्हाटसऍप युनिर्व्हसीटीचे चिंटू काय सांगू इच्छीत आहेत. विचार करा हिमांशी ज्या पध्दतीने बोलल्या आहेत. त्या पध्दतीने बोलण्याची हिम्मत बहुदा दुसऱ्या महिलेमध्ये नसेलच. त्यांचा नवरा त्यांच्या समोर मरण पावला.त्यांचाच फोटो सर्वात अगोदर व्हायरल झाला होता आणि तोच फोटो घेवून भारतीय जनता पार्टीचे नेते धर्म पुछकर मारा असा द्वेष पसरवित होते. वाचकांनो हा प्रयत्न तर पाकिस्तानचा आहे की, भारतात हिंदु विरुध्द मुस्लिम असे भांडण लागावे आणि तोच अजेंडा आमच्या देशातील नेते चालवितात हे किती दुर्देवाचे आहे. भारताचे पंतप्रधान विदेशामध्ये वसुधैव कुटूंबकम ची संकल्पना मांडतात आणि आपल्या वाघाच्या पत्नीबद्दल आमच्याच घरातील मंडळी या महिलेने आपला नवरा खाऊ टाकला अशा शब्दात तिला ट्रोल करतात. कोठे पोहचली आहे भारतीय संस्कृती. वसुधैव कुटूंबकम या संकल्पनेत असे बोलण्याची पध्दत आहे काय? हिमांशी आणि विनय यांचा फोटो ज्या संवेदनशिल माणसाने पाहिला. त्याचे हृदय हेलावून गेले आहे आणि त्या महिलेबद्दल तुम्ही ट्रोलिंग करून तिला त्रास देत आहात.

खरे तर ट्रोलिंग करणाऱ्यांच्या हिशोबाने हिमांशी बोलत नव्हत्या आणि म्हणून त्या गाढवांनी हिमांशी विरुध्द ट्रोलिंग केले. हिमांशी सांगत आहेत की, ज्यांनी ही घटना घडवली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. मग हिमांशीला ट्रोल करण्याऐवजी त्या ट्रोल मास्टरांनी घाटीमध्ये जावे हिमांशीचे पती विनय यांच्यासह 28 जणांना मारणाऱ्या अतिरेक्यांना शोधावे आणि त्यांना कंठस्नान घालून दाखवावे की आम्ही घेतला बदला. हिमांशीला ट्रोल करून तुम्हाला काय साध्य होणार आहे. पण तेथे जाऊन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी जो दम लागतो तो तुमच्यात नाही. तुमची औकात फक्त हिमांशीला ट्रोल करण्याएवढीच आहे. खरे तर आम्ही कालच हिमांशीला सल्युट केलेला आहे आणि आज तर आम्ही त्यांना साष्टंग नमस्कार करत आहोत. कारण ती पात्रता आहे त्यांच्यात आणि आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये या देवी सर्व भुतेशु मातृ रुपेण संस्कृता.. या वचनांना मानतो.

खरे तर प्रश्न हिमांशीला विचारण्याऐवजी सरकारला विचारले गेले पाहिजे कारण आज सरकारचे चॅनल सांगत आहेत. अतिरेक्यांनी असा प्रवेश मिळवला, अशी रेकी केली, असा पळून जाण्याचा मार्ग शोधला. अहो जर सर्व कळत असेल तर ते प्रवेश करणार आहेत हे का कळले नाही आणि अडीच हजार पर्यटक आहेत त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती. गुजरातमधील शैलेशची पत्नी इशान्या म्हणाली की आमच्या देशाने आम्हाला तेथे अनाथ सोडले होते. त्यांचा लहान बाल सुध्दा म्हणाला की, तेथे कोणीच नव्हते. खोटा प्रचार कसा होत आहे याचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला. एक जीप लाईन ऑपरेटर एका पर्यटकाला बसवून पाठवत असतांना अल्ला हो अकबर म्हणाला. हा सुध्दा अतिरेक्यांशी मिळाला आहे अशा बातम्या केल्या. एनआयएने त्याला ताब्यात घेतले. परंतू एनआयएने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या तोंडातून अल्ला हो अकबर हा निघालेला शब्द सर्वसामान्य उच्चारण आहे. ज्या प्रमाणे आम्ही अरे देवा असे अनेकदा म्हणतो. तसाच अर्थ अल्ला हो अकबरचा आहे. अल्ला सर्वात मोठा आहे की, गॉड इज गे्रट. परंतू त्याला अतिरेकी बनविण्याचा झालेला प्रयत्न किती दुर्देवी आहे. पश्चिम बंगालमधील बोगाव रेल्वे स्थानकाच्या फलाटावर हिंदुस्थान मुर्दाबाद, पाकिस्तान जिंदाबाद असे लिहुन त्याच्या बाजूला पाकिस्तानचा झेंडा लावणारे दोन जण पश्चिम बंगाल पोलीसांनी पकडले. ते सनातन एकता पार्टीचे चंदन मालाकार आणि प्रम्योजित हे आहेत. असे चालणार आहे काय? हे अतिरेकी गोळ्या मारणाऱ्यांपेक्षा जास्त खतरनाक दिसतात. संजय शर्मा यांचे 4 पीएम चॅनल शासनाने बंद केले, नेहासिंह राठोड आणि डॉ.मेडूसा, संत श्री अभिमुक्तेश्र्वरानंदजी यांच्या विरुध्द राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गुन्हे दाखल करण्यात आले. काय धोका आहे यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला याचे उत्तर मात्र कोठेच मिळत नाही. आजच्या परिस्थिती कल्पनेपेक्षा विचित्र भारतात आम्ही जगत आहोत असे लिहिले तर चुकीचे ठरणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!