परभणी(प्रतिनिधी)- परभणी येथे कार्यरत पोलीस निरिक्षक आणि अतिरिक्त कार्यभार पोलीस मुख्यालय परभणी येथील पोलीस उपअधिक्षक पद सांभाळणारे अनिरुध्द काकडे यांचा त्यांच्या जबरदस्त कामगिरीसाठी 1 मे रोजी सन्मान करण्यात आला आहे.
पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्याकडे सध्या जागांच्या उपलब्धतेप्रमाणे परभणी जिल्ह्यातील पोलीस उपअधिक्षक मुख्यालय हे काम सुध्दा देण्यात आले आहे. अतिरिक्त कार्यभार असतांना सुध्दा अनिरुध्द काकडे यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरिक्षक यांचे सेवापट अत्याधुनिक पध्दतीने स्कॅन करून त्या सेवापटांच्या छायांकित प्रति तयार केल्या आणि त्या प्रती परभणी जिल्ह्यातील पोलीस शिपाईत ते पोलीस उपनिरिक्षक या सर्वांच्या कुटूंबियांना कायम स्वरुपी दिल्या. सेवा पटाची सॉफ्ट कॉपी पोलीस अधिक्षक परभणी यांच्या ईमेलमार्फत संबंधीतांना पाठविली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरिक्षक या सर्वांचे सेवापट आता संगणीकृत झाले आहे. या प्रोजेक्ट कारकिर्द ही संकल्पना अनिरुध्द काकडे यांनी यशस्वी रित्या राबवली आहे.
परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी 1 मे रोजी सन्मानपत्र देवून पोलीस निरिक्षक तथा प्रभारी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय यांचा सन्मान केला.
प्रभारी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय परभणी अनिरुध्द काकडे यांचा सन्मान
