नांदेड(प्रतिनिधी)-जीवनात दमबाज कामगिरी केल्यानंतर त्याचा सन्मान होणे हे क्रमप्राप्तच असते. असाच सन्मान पोलीस अंमलदार गजानन कदम यांना आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्राप्त झाला.
नांदेड जिल्हा पोलीस दलात 25 जुलै 2006 रोजी पोलीस शिपाई या पदावर भरती झालेले गजानन बळीराम कदम बकल नंबर 784 यांना आपले प्रशिक्षण आणि सुरूवातीचा कार्यकाळ झाल्यानंतर सन 2010 ते 2016 असे सहा वर्ष कुटूंर पोलीस ठाण्यात सेवा दिली. त्यानंतर आणि 2016 ते 2022 या दरम्यान त्यांनी सहा वर्ष वजिराबाद पोलीस ठाण्यात आपल्या सेवा प्रदान केल्या. सन 2022 पासून त्यांची नियुक्ती भाग्यनगर पोलीस ठाण्यात आहे. परंतू ते उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर या कार्यालयात सलग्न आहेत. आपल्या 19 वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी 100 पेक्षा जास्त बक्षीसे प्राप्त केली आहेत.
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या मुहूर्तावर नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी त्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाल्यानंतर पुष्पगुच्छ देवून सन्मान केले. याप्रसंगी खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांची उपस्थिती होती. वास्तव न्युज लाईव्ह न्युज परिवाराच्यावतीने सुध्दा गजानन कदम यांचे अभिनंदन..
दमदार पोलीस अंमलदाराचा दमदार सन्मान
