नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार सुशिल कुबडे यांना आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. त्यानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी सुध्दा सुशिल कुबडेंचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला.

नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार सुशिल कुबडे बकल नंबर 851 हे सन 2007 मध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई या पदावर नियुक्त झाले होते. आपले प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर सुशिल कुबडे यांना प्रथम नियुक्ती पोलीस ठाणे वजिराबाद येथे प्राप्त झाली. सहा वर्ष काम केल्यानंतर त्यांना जिल्हा विशेष शाखेत नियुक्ती मिळाली. तेथील त्यांनी आपला सहा वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला. सध्या मागील आठ महिन्या पासून उस्माननगर पोलीस ठाण्यात बिट अंमलदार म्हणून काम पाहत आहेत.
पोलीस खात्यात त्यांना मिळालेले सर्व कर्तव्य त्यांनी योग्यरितीने पार पाडल्यामुळे त्यांना पोलीस महासंचालकांच्यावतीने सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. हे सन्मानचिन्ह 1 मे रोजी नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आले. त्याप्रसंगी खा.अशोक चव्हाण, खा.अजित गोपछडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची उपस्थिती होती. त्यानंतर नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी सुध्दा सुशिल कुबडेला पुष्पगुच्छ देवून त्याचे कौतुक केले आहे.

