नांदेड (प्रतिनिधी)-किनवट तालुक्यातील गोकुंदा भागातील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. तसेच तामसा गावातील नांदेड रस्त्यावर असलेल्या एका मोबाईल शॉपीत काही जणांनी प्रवेश करून मारहाण करत 2 लाख 95 हजारांच्या ऐवजाची लुट केली आहे.
नागोराव महादु तरटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 एप्रिलच्या रात्री 10 ते 29 एप्रिलच्या पहाटे 5.30 वाजेदरम्यान उकाडा जास्त असल्याने घराला कुलूप लावून ते छतावर झोपले होते. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आणि त्यांचे घरफोडून आत प्रवेश केला आणि 1 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. किनवट पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 124/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक झाडे हे करीत आहेत.
तामसा येथील राहुल बालाजी सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 एप्रिलच्या सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास गणेश होम अप्लाईन्सेस आणि मोबाईल शॉपीच्या नांदेड रस्त्यावरील गोडाऊनमध्ये दिलीप जगदेवराव कांबळे आणि इतर काही मंडळी घुसली. त्यांनी त्यांना आणि नोकरांना नवीन मोबाईलची मागणी केली. मोबाईल देण्यास नकार दिल्यानंतर राहुल सुर्यवंशीच्या गळ्यातील सोन्याची चैन, बोटातील अंगठ्या आणि कॅश कॉऊंटरमधील रोख रक्कम असा 2 लाख 95 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 80/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक नरवटे अधिक तपास करीत आहेत.
किनवटमध्ये 1 लाख 40 हजारांची चोरी; तामश्यात 2 लाख 95 हजारांचा दरोडा
