विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम गरजेचे-अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर

नांदेड –शिक्षण हा महत्त्वाचा विषय असून विद्यार्थी घडविण्याचे व समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण देण्यासाठी नावीण्यपूर्ण उपक्रमाची गरज आहे, असे प्रतिपादन नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांनी केले.

 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने शंभर दिवसाचे विविध उपक्रम राबविले, जे शिक्षक आणि अधिकारी विद्यार्थी आणि समाजाच्या विकासासाठी अधिक उपक्रम राबवतील त्यांचा सन्मान झाला पहिजे. त्याच बरोबर नांदेड जिल्हा कॉपीमुक्त होऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजे आहे. शिक्षणासाठी महान कार्य करणार्‍या थोर नेत्यांच्या कार्याची माहिती आणि आधुनिक शिक्षण याबद्दल मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघाचे अध्यक्ष केशवराव जाधव तर शिक्षक नेते माधवराव पाटील, राज्य सरचिटणीस लायक पटेल, किशन घोलप, व्यंकट कल्याणपाड, सुभाष जीरवनकर, प्रल्हाद इगे, रमेश घुमलवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निळकंठराव चोंडे तर आभार जिल्हाध्यक्ष शंकर हासगुळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!