उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे !
नांदेड_ क्रांतीसूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सिडको भागातील रमाई चौक येथे भव्य अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले.
युग प्रवर्तक क्रांतीसुर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच रांगा लागल्या होत्या. जयंतीनिमित्ताने दिवसभरात ठिकठिकाणी अन्नदान, पाणीवाटप, रक्तदान यासारखे सामाजिक उपक्रमांसह २४ तास अभ्यास उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
जन्मोत्सवानिमित्त आतषबाजी करण्यात आली. याप्रसंगी शंभरगाव येथील प्रतिष्ठित अधिकारी व कर्मचाऱ्यां तर्फे भव्य अनदान वाटप व पाणी वाटप करुन महामानवास अभिवादन करण्यात आले आदींची उपस्थिती होती, कृषी बाजार समिती चे सदस्य मधुकर डाकोरे, रोहिदास डाकोरे,एस.टी.मंडळाचे कर्मचारी माधव वाघमारे, मुंबई पोलीस अनिल डाकोरे, वनअधिकारी सुनिल डाकोरे,(SRPF) अमोल डाकोरे, (पत्रकार)विनोद डाकोरे, विलास डाकोरे, बाळासाहेब डाकोरे, गौतम डाकोरे, राजू डाकोरे,विकास डाकोरे, आकाश डाकोरे,यशवंत वन्ने, प्रकाश डाकोरे,यावेळी अबालवृद्ध, तरुण, तरुणी, पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.