नांदेड(प्रतिनिधी)- गुरूद्वाराजवळ बनावण्यात आलेला पादचारी उडाणपूल अत्यंत दुर्देवी अवस्थेत आहे. त्यासंदर्भाने नांदेड दक्षिणचे आ. आनंदराव पाटील बोंेढारकर यांनी स्वत: त्या पुलाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हा धोकादायक पूल हटविण्याची सुचना पण केली. परंतु त्याचा पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते स. राजेंद्रसिंघ शाहू यांना मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिसाद दिलेला नाही. याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम विभागाने आ. बोंढारकरांच्या शब्दांना सुद्धा काही प्रतिसाद दिलेला नाही.
नांदेड शहरातील गुरूद्वारा चौरस्ता आणि देगलूर नाका भागातील चौकात दोन पादचारी पूल उभारण्यात आले. पण या पुलाच्या बांधकामासाठी झालेल्या खर्चाच्या तुलनेत पूल मात्र अत्यंत वाईट परिस्थिती आहे. यासंदर्भाने अनेकदा गुरूद्वाराजवळचा पूल काढून टाका, नाहीतर जिवीतहानी होईल असेही सांगण्यात आले. कारण गुरूद्वारा चौकात असलेल्या या पुलाजवळून दरवर्षी अनेक हल्ला-महल्ला मिरवणुका निघत असतात. या मिरवणुकीदरम्यान जनतेतील हजारो नागरीक या पादचारी पुलावर थांबतात परंतु पादचारी पुलाची असलेली दुर्दशा ही इतरांची जीवास धोका निर्माण करू शकते म्हणून मागच्या काही वर्षांपासून पोलीस विभाग त्याठिकाणी पुलावर जनतेतील लोकांना जाऊ देत नाही. पण अखेर हा पूला काय कामाचा. म्हणजे पैसेही गेले, त्या पैशांचा उपयोगही झाला नाही आणि जनतेचा जीव धोक्यात आला. अशीच काहीसी अवस्था देगलूर नाका पुलाची पण आहे, पण त्याठिकाणी एकाचवेळी हजारो नागरीक त्या पुलावर थांबतील असा कोणताही समारोह होत नाही.
काही दिवसांपुर्वी गुरूद्वारा भागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांना तेथे बोलाविले होते. ती जागा, त्यावरील पूल तेथे निघणारे अनेक सोहळे यांचा विचार करून आ. बोंढारकरांनी हा पूल काढून टाकण्याची सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केली होती. या संदर्भाने आ. बोंढारकरांसोबत त्या पुलाची पाहणी करणारे एक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्रसिंघ नवनिहालसिंघ शाहू यांनी 16 वर्षांपुर्वी केलेले या पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट आहे, तरी पण आमदारांनी सांगितलेल्या नंतर तरी तो पूल हटवायला हवा होता. पण आमदारांच्या शब्दाला सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे किंमत नाही, यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा लक्षात येत आहे. आता आ. आनंदराव बोंढारकर काय भुमिका घेतात, हे पाहण्यासारखे आहे.
गुरूद्वारा चौकातील पादचारी पूल आमदारांच्या सांगण्यानंतर सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग पाडणार नाही म्हणे
