नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेने विना परवानगी लावलेले एक होर्डींग काढल्यानंतर त्याचे व्हिडीओ करून तो प्रकल्पच बनावट आणि खोट्या कागदपत्रांवर आधारीत असल्याचा दावा पत्रकार शेख याहिया यांनी आपल्या बातमीत केला आणि त्यास अर्धापूर येथील नगरसेवक शेख जाकीर शेख सगीरने दुजोरा दिला. पण या प्रकल्पाचे विकासक सतिश शर्मा यांनी आमच्याकडे असलेल्या शासकीय कागदपत्रांना खोटे आहेत असे सांगण्याचा अधिकार या दोघांना नाही. त्यावर सक्षम अधिकारी चुक असेल तर कार्यवाही करतील. या दोघांबद्दल आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करत असून त्यांच्याविरुध्द मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सतिश शर्मा यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपुर्वी स्टार गार्डन नावाचे एक निवासी प्रकल्प माळटेकडी रस्त्यावर सुरू करण्यात आले आहे. हा प्रकल्प गट क्रमांक 125, 127, 129 यावर सुरू आहे. 1975 मध्ये ही जागा बळवंतराव गोदमगावकर यांच्या नावावर होती. ती जागा त्याच वर्षी गणेश मोहन गवळी यांनी खरेदी केली आणि पुढे मोहनलाल व्यास आणि त्यांच्या भावांनी ही जागा खरेदी केली. ती जागा आता सतिश शर्मा यांनी विकास करण्यासाठी घेतली. त्यावर सध्या रोड बनविणे, नाल्या तयार करणे आदी काम सुरू आहे. काही दिवसांपुर्वी यांनी आपल्या स्टार गार्डन या प्रकल्पाची जाहीरात करणारे एक होर्डिंग रस्त्यावर लावले होते. त्यावर महानगरपालिकेने बिना परवानगी होर्डिंग आहे म्हणून कार्यवाही केली. याचे व्हिडीओ चित्रीकरण शेख याहिया या पत्रकाराने केले आणि हा स्टार प्रकल्प खोट्या आणि बनावट कागदपत्रांवर तयार करण्यात आलेला आहे असे बातमीपत्र युट्युबवर टाकले.
त्यानंतर पुढच्या व्हिडीओमध्ये शेख याहियाने अर्धापूर येथील राष्ट्रवादी कॉंगे्रस (अजित पवार गट) चे नगरसेवक शेख जाकीर शेख सगीर यांची मुलाखत घेतली. मी मुस्लिम समाजाचा रखवालदार आहे असे सांगत शेख जाकीरने हा प्रकल्प कबरस्थानच्या जागेवर आहे, येथे शाळा, दवाखाना, मुलांचे खेळण्याचे मैदान यासाठी आरक्षीत असल्याचे सांगून या खोट्या प्रकल्पाचा कोणीच खरेदीदार हा ेणार नाही असे वक्तव्य केले.
यानंतर या तिन गटाचे विकासक सतिश शर्मा आणि जागा मालक मोहनलाल व्यास यांनी वास्तव न्युज लाईव्हशी संपर्क साधला आणि सांगितले की, 18 मार्च 2011 रोजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत संम्मत झालेला ठराव क्रमांक 21 दाखवला. त्यात सर्व्हे क्रमांक 125, 127, 129 मध्ये गार्डन, प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठीचे आरक्षण काढून टाकण्यात आलेले आहे. त्या ठरावामध्ये महानगरपालिकेवर आर्थिक बोजा पडणार नाही अशा पध्दतीची मोकळी जागा उपलब्ध असल्यामुळे हे आरक्षण काढले आहे असे नमुद आहे. म्हणजचे या जागेवर कोणतेच आरक्षण नाही असे स्पष्टपणे दिसते. याच दिवशीच्या ठराव क्रमांक 124 मध्ये सर्व्हे नंबर 129 मधील 15 मिटर विकास योजना रस्ता आणि रेल्वे ट्रॅक यासाठी यातील सुमारे 4 एकर जागा आरक्षीत असल्याचे सांगितले. परंतू या प्रस्तावात सर्व्हे नं.129 च्या जागेच्या सभोताली विविध जाती धर्मांची लोकवस्ती झाली आहे. तेथे कब्रस्तान करण्यात येवून नये अशी मागणी या भागातील नागरीकांनी केल्यामुळे तेथील कबरस्तान रद्द करण्यात आले आहे. त्यासाठी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मालकीची कापुस संशोधन केंद्राच्या उपलब्ध जागेपैकी 4 एकर जागा मुस्लिम कब्रस्तानसाठी राखीव करण्यात आली होती.
सोबतच विकासक सतिश शर्मा यांनी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचा दि.15 डिसेंबर 2023 चा शासन निर्णय दाखवला. त्यामध्ये नगर विकास विभागाचे अव्वर सचिव प्रसाद शिंदे यांची स्वाक्षरी आहे अणि राज्यपालांच्या मंजुरीनंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये सर्व्हे क्रमांक 125, 127/2 आणि 129 हे वगळण्यात आल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. या संदर्भाची माहिती अनिल मोहनलाल व्यास यांनी 22 डिसेंबर 2023 रोजी महानगरपालिकेला पण दिली आहे. नगर विकास विभागाचा हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर सुध्दा प्र्रसिध्द करण्यात आलेला आहे.
एकंदरीतच आमच्या स्टार गार्डन प्रकल्पाची बाजू कायदेशीरपणे सक्षम आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना या व्हिडीओमध्ये भ्रष्टाचारी म्हटले जात आहे. आमचे काही कागदपत्र चुकीची असतील तर त्यावर सक्षम प्राधिकरणाचे अधिकारी नक्कीच कार्यवाही करतील. शेख याहिया आणि शेख जाकीर यांना आमच्या कागदपत्रांना खोटे कागदपत्र आहेत असे सांगण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न मोहनलाल व्यास यांनी उपस्थित केला. सतिश शर्मा सांगता शेख जाकीर हे अर्धापूर येथील अजित पवार गटाचे नगरसेवक आहेत. त्यांनी व्हिडीओमध्ये त्यांचे नाव वापरले आहे. हा अजित पवारांच्या नावाचा दुरूपयोग आहे. आम्ही या संदर्भाने अजित पवारांशी सुध्दा संपर्क साधून त्यांच्यासमोर सत्यता मांडणार आहोत. सतिश शर्मा सांगतात मी माझ्या स्टार गार्डन प्रकल्पातील सदस्यांना, खरेदीदारांना आवाहन करतो आहे की, आमच्याकडे असलेली कोणतीही कागदपत्रे तपासण्याचा आपला अधिकार आहे. ती सर्व कागदपत्रे आम्ही आपणास दाखवायला तयार सुध्दा आहोत. तेंव्हा अशा कोणत्याही भुलथापांच्या व्हिडीओला बळी न पडता प्र्रत्यक्षात खात्री करून आमच्यासोबत व्यवहार करावा. शेख याहिया आणि शेख जाकीर शेख सगीर यांनी समाज माध्यमांवर आमच्या प्रकल्पाच्या केलेल्या बदनामी संदर्भाने आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांशी सल्लामसलत करत आहोत त्यानंतर या दोघांविरुध्द कायदेशीर कार्यवाही करणार आहोत असे सतिश शर्मा म्हणाले.
शेख याहिया आणि शेख जाकीरने आमच्या कायदेशीर प्रकल्पाची बदनामी केली-सतिश शर्मा

Video Player
00:00
00:00