शिक्षण,संसद आणि संविधानाचे संरक्षण करता आले पाहिजे.विविधतेने नटलेल्या,अंखड भारताचे स्वप्न पाहणे म्हणजे, ब्राह्मणी विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. विविधतेने नटलेल्या भारताचे स्वप्न रंगवणे हा लोकशाहीवर चढवण्यात आलेला वैदिक मुलामा आहे. खरे तर विविधता आणि अंखंडत्व या दोन्ही गोष्टी टोकाच्या भिन्न आहेत.तरीही याची सांगड घालण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ‘फोडा आणि झोडा’ या परकीय नीतीचा आविष्कार करणे होय.
व्यक्तीपेक्षा विचार आणि देश मोठा आहे ही राष्ट्रनिर्मात्या बाबासाहेबांची विचारप्रणाली होती.त्यांची ही कृतिशील विचारप्रणाली केवळ विचारप्रणालीच राहिली नाही तर ती कृतिप्रणालीही बनली. बाबासाहेब पहिल्यांदा कृती करीत आणि नंतरच त्यासंबंधीचा तर्कशुद्ध विचार मांडत.म्हणून बाबासाहेबांनी उचललेले प्रत्येक पाऊल राष्ट्रीय कृतीचे होते राष्ट्रीय सन्मानाचे होते.परंतु तो दर्जा त्यांच्या कृतीला मिळू दिला गेला नाही.जातीच्या चष्यातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची,राष्ट्रीय भूमिका तपासली गेली.हा अपराध एकविसाव्या शतकातही राजरोसपणे केला जातो,याची चीड येते आणि खंत ही वाटते.देशाच्या विघटना विरुद्ध,विषम तत्त्व प्रणालीविरुद्ध आणि मूल्यहीन धर्मांध संस्कृती विरुद्ध लढण्यात बाबासाहेबांनी रक्ताचा थेंबन् थेंब आटवला,परंतु ‘हिंदू व्यवथेविरुद्ध बाबासाहेब’ असे समीकरण पुढे करून स्वतःला हिंदू समजणाऱ्या भारतीयांच्याही मनात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी खोटा द्वेष निर्माण केला.खरे तर डॉ.बाबासाहेबांनी धर्मांतर केले तेही राष्ट्रहित लक्षात घेऊनच! यात मतभेद असण्याचे काही कारण नाही.ते बावीस प्रतिज्ञेपैकी एका प्रतिज्ञेत म्हणतात, ‘मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो.’ यावरून बाबासाहेबांची विचारनिष्ठा आणि देशनिष्ठा आपल्या लक्षात येते.स्वदेशाच्या चळवळीपेक्षा भारतीय नागरिकांच्या उत्कर्षासाठी अहोरात्र संघर्ष करणे अवघड होते. कोणताही आड पडदा न ठेवता भारतीय नागरिकांच्या सन्मानासाठी अहोरात्र झगडणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव राष्ट्रपुरुष होते.की ज्यांना निर्विवादपणे राष्ट्रनिर्माते म्हटले जाऊ शकते.मात्र मूल्यहीन संस्कृतीच्या धर्मांध ठेकेदारांनी त्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्याचेही क्रूरकर्म केले आहे.
—- प्रा. राजू सोनसळे
भ्र. 9850570410