प्रतिभानिकेतन हायस्कूलच्या 1993 बॅचच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे 19 रोजी गेट टुगेदर

 

नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील कैलाशनगर येथील प्रतिभानिकेतन हायस्कूल येथील 1993 च्या दरम्यान दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेंहमिलन कार्यक्रम शनिवार दि.19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल विसावा, नांदेड येथे आयोजित केला आहे.

या बॅचच्या ग्रुप मधील काही जण डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, संस्था चालक, पोलीस अधिकारी, खाजगी नोकरी, पत्रकार, तर काही जण स्वतःचा उद्योग करीत आहेत. प्रत्येकजण. कुठल्या ना क्षेत्रात आज कार्यरत आहे. लहानपणाचे बालमित्र तब्बल 32 वर्षांनंतर कोण कुठे आहे कोणालाही कल्पना नाही. सोशल मिडीयाच्या माध्यमातून कांही जणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न अरीत आहेत. दहावीत असलेल्या 1993 च्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधत आहेत. बालमित्रांचा व्हॅटस्‌ऍप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ग्रुप मधील सगळ्यांचा संपर्क व्हावा म्हणून गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित केला आहे. या माध्यमातून 32 वर्षाचा संपर्क तुटल्याने पुन्हा एकदा त्या वयात जाऊन मागील भूतकाळातील स्मृतींना उजाळा मिळणार आहे. पूर्वी कसे होतो. आता कसे आहोत. याबाबतीत बालपणीचा लेखा जोखा मांडता येणार आहे. बर्‍याच दिवसा नंतर एकत्र येत आहोत हेच आपले भाग्य आहे. कोणाच्या सुख दुःखात देखील आपल्याला आपल्या ग्रुप मार्फत मदत करता येईल, त्यानंतर कोणाच्या काही अडचणी असतील त्यावर मात करता येईल यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. भविष्यात आपले खूप मोठे नियोजन करण्याचे ठरविले आहे. बालमित्रांचा गेट टूगेदर कार्यक्रम दि.19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रतिभानिकेतन हायस्कूलधमील तत्कालिन गुरुजणांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. गेट टूगेदर कार्यक्रमासाठी गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरु असून अनेक बालमित्रांना व मैत्रीणींना संपर्क साधला आहे. या गेट टूगेदर कार्यक्रमाला 1993 बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नंदकिशोर पारडे, गिरीष जाधव, माजी नगरसेवक दुष्यंत सोनाळे, अविनाश पाटील, मनिष पेकम, अनुजा टेकाळे, भक्ती कुलकर्णी, गोदावरी बोधमवाड, डॉ.मेधा उमरजकर यांच्यासह बालमित्रांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!