नांदेड(प्रतिनिधी)-आज चैत्र पौर्णिमा पवनपुत्र, भगवान हनुमंतांचा जन्मोत्सव आज पहाटे सुर्योदयापासूनच शहरातील अनेक मारोती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. काही ठिकाणी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुध्दा संपन्न झाला. काही ठिकाणी महाप्रसाद उद्या होणार आहे. बजरंग बली की, जयच्या घोषणांनी आसमंत दुमदुमले.
आज सुर्योदयासोबतच मारोतीमंदिरांमध्ये भक्तांची रिघ लागली होती. शहरातील प्रसिध्द हनुमानगढ, गाडीपुरा हनुमान मंदिर, सिडको येथील हनुमान मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, जागृत हनुमान मंदिर पावडेवाडी नाका येथे भक्तांची रिघ लागली होती. मंदिरांना फुलांनी सजविण्यात आले होते. पुजाऱ्यांनी सकाळी मारोतींची पुजा करून आरती केली आणि त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मारोतीरायांची आरती करण्यात आली. सर्वत्र अत्यंत उत्साहात भगवान मारोतींचा जन्मोत्सव साजरा झाला. सायंकाळी भगवान हनुमंताची एक मिरवणूक काढण्यात आली ज्यामध्ये युवक युवती सामील झाले होते
पवनपुत्र हनुमान यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा
