पत्रकारांनी आता सत्ताधीशांच्या प्रमाणेच बातम्या लिहाव्यात नाही तर त्यांची कधी, कशी, कोणी वाट लावली हे त्यांना सुध्दा कळणार नाही असाच एक प्रकार युट्युब चॅनल चालक गिरीजेश वशिष्ठ यांच्यासोबत घडला आहे. त्यांनी दुसऱ्या एका चॅनलवरून आपल्या दर्शकांना आवाहन केले आहे की, माझ्या दुसऱ्या युट्युब चॅनलला सस्क्राईब करा कारण यातूनच माझे आणि माझ्या कुटूंबियांचे जीवन चालते.
काल सकाळी गिरीजेश वशिष्ठ आपल्या दररोजच्या व्यायामासाठी गेले होते. तेथे त्यांनी मोबाईलवर आपले चॅनल नॉकिंग न्युज पाहिले असता त्यावर क्रिप्टो करंसीचे ब्लॉक दिसले. त्यांच्या चॅनलचे संपुर्ण आलेख बदलले होते. त्यांना वाटले काही तरी हॅकींग झाली असेल. पण प्रश्न असा होता की, दोन प्रकारची सुरक्षा करून त्यांनी हे चॅनल चालविलेले आहे. म्हणजे त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आल्याशिवाय त्या चॅनलमध्ये कोणीच काही फेरफार करू शकत नाही. परंतू आजच्या तंत्रज्ञान युगात काही तरी नवीन घडले असेल असा साधा विचार करून ते घरी आले. यापुर्वी सुध्दा त्यांच्यासोबत त्यांचे फेसबुक पेज असेच हॅक करून बंद पाडण्यात आले होते. स्वतंत्र आणि निर्भीड पत्रकारीता करण्याची किंमत त्यांना मोजावी लागलेली आहे.
घरी येवून त्यांनी आपल्या संगणकावरून पुढे पाहणी केली असता युट्युब चॅटींगमध्ये त्यांनी याबाबत तक्रार केली. युट्युबने त्यांना एक फॉर्म दिला आणि तो फॉर्म भरून द्या असे सांगितले. लगेचच त्यांनी तो फॉर्म भरला आणि तो फार्म भरल्याबरोबर त्यांचे युट्युब चॅनल कायम बंद करण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की, कम्युनिटी स्टॅंडर्डप्रमाणे तुमचे चॅनल समाजासाठी अयोग्य आहे. वशिष्ट सांगतात मी जर समाजाविरुध्द काही केले असेल तर नक्कीच माझे चॅनल बंद व्हायला हरकत नाही. पण माझे चॅनल बंद झाल्यानंतर मी अपील केले. ती अपील सुध्दा कम्युनिटी स्टडर्डच्या नावाखाली फेटाळण्यात आली. खऱ्या अर्थाने हे कम्युनिटी स्टडर्ड का आहे याचा सविस्तर उल्लेख मात्र युट्युबने केला नाही.
गिरिजेश वशिष्ठ सांगतात मी अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या बऱ्याच पोल उघड केल्या आहेत. आजच्या लोकतंत्राच्या माध्यमातून हिटलरशाही आणली जाणार आहे. अशा आशयाने माझ्या बातम्या प्रसिध्द केल्या आहेत. बहुदा त्यामुळे सुध्दा किंवा भारतातील माझ्या काही हितचिंतकांमुळे युट्युबकडे कोणी तरी काड्या केल्या आणि माझे चॅनल बंद पाडण्यात आले.
सत्य, खऱ्या, निर्भिड, पोलखोल करणाऱ्या बातम्या लिहिण्याची आणि दाखविण्याची ही किंमत गिरिजेश वशिष्ठ यांना भोगावी लागली आहे. त्यांनी आपल्या एका दुसऱ्या चॅनलवरून आपल्या दर्शकांना आवाहन केले आहे की, माझे दुसरे चॅनल सस्क्राईब करून माझे कुटूंब चालविण्यासाठी मदत करा. निर्भिड पत्रकारीता करतांना माझे कुटूंब चालविण्याची जबाबदारी सुध्दा माझीच आहे आणि त्यासाठी तुमच्या मदतीशिवाय ती जबाबदारी मी पुर्ण करू शकणार नाही. प्रत्येक पत्रकाराने आता यापुढे सत्ताधीशांच्या आवडीच्याच बातम्या लिहाव्यात काय? हा प्रश्न आम्ही जनतेने उत्तर द्यावे यासाठी सोडत आहोत.
सोबत गिरीजेश वशिष्ठ यांच्या दुसऱ्या युटयुब चॅनलची लिंक जोडत आहोत. ज्याला सस्क्राईब करून निर्भिड बातम्या आणि सत्य बातम्या पाहण्यासाठी तसेच गिरीजेश वशिष्ठ यांना मदत व्हावी म्हणून जोडत आहोत.
नॉकिंग न्युज चॅनलच्या बातम्या समाप्त
