जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातीमध्ये पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी

जिल्हा गुंतवणूक परिषदेत 134 सामंजस्य करार

1 हजार 207 कोटींची गुंतवणूक तर 4 हजार 32 रोजगार निर्मिती        

नांदेड – जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यातक्षम उद्योग तयार करुन जिल्ह्यातून जास्तीत जास्त निर्यात करावी. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेवून उद्योग उभारावेत, जेणेकरुन स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

आज जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने तुलसी कम्फर्ट येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -२०२५ संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे सहसचिव संजय इंगळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक दिलीप दमय्यावार, मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी सागर औटी, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी धनंजय इंगळे, अग्रणी बँक व्यवस्थापक आलोकनाथ शर्मा, निर्यात सल्लागार आकाश ढगे, उद्योजक संघटनेचे शैलेष कराळे तसेच विविध शासकीय विभाग, बँकाचे प्रतिनिधी, उद्योजक, निर्यातदार, व्यापारी आदीसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करारासोबत उद्योग क्षेत्राशी निगडित विविध विषयावर जसे निर्यात क्षेत्रातील विविध संधी, पणन, शासनाच्या विविध योजनांबाबत तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

गुंतवणूक परिषदेत झालेले प्रमुख सामंजस्य करार याप्रमाणे आहेत.

एम.व्ही.के.ॲग्रो फुट प्रोडक्ट लि., रिलायन्स इंडस्ट्रिज लि., नांदेड बायो फ्युल प्रा.ली., निसर्ग जॅगरी मिल्स प्रा.ली., श्री. सुभाष शुगर प्रा.ली., गोदावरी इंजिनियरींग सोल्युशन, गोदावरी इंजिनियरिंग सोल्युशन, गोदावरी ड्रग्स लि. , माधव रिजंन्सी, एस. आर.व्ही.एनर्जी प्रा.ली., एकदंत सोया प्रा. ली.

या गुंतवणूक परिषदेचे प्रास्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, यांनी तर जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राशी संबंधीत विविध बाबींचा उहापोह श्री. इंगळे यांनी केला. ही गुंतवणूक परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण , अनिल कदम तसेच सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!