नांदेड- जिल्हातील जिल्हा कोषागार, कार्यालय नांदेड येथील कर्मचारी प्रविण पडलवार यांची याच कार्यालयात उप कोषागार अधिकारी या पदावर पदोन्नती झाली आहे.नांदेड कोषागार कार्यालया मध्ये श्री पडलवार हे सहकार्याची भावना ठेवून समोर आलेले कामकाज सकारत्मक दृष्टीकोनातून कायम कामकाज पार पाडत असतात.आलेल्या प्रत्येकाला व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करतात. अभ्यासूपणा व नियमाचे काटेकोर पालन हे त्यांच्या स्वभावाचे विशेष गुणातून त्यांनी मोठा मित्र परिवार जमवलेला आहे. सर्वाचे आवडते आहेत.
प्रेमळ, श्री पडलवार मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्व लाभलेले असून त्यांचा मित्र परिवार ही मोठा आहे.
नुकतेच मा.सहसंचालक, (लेखा व कोषागारे) कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी उपकोषागार अधिकारी पदाचे पदोन्नतीचे आदेश निगर्मित केले आहेत.
नांदेड जिल्हा हिवताप कार्यालय येथील कार्यालयीन अधिक्षक कैलास सावळे, जिल्हा हत्तीरोग नियंत्रण पथक,नांदेड येथिल सहाय्यक अधिक्षक श्री विजय चव्हाण, हिवताप संघटनेचे पदाधिकारी व आरोग्य निरक्षक सत्यजीत टिप्रेसवार, लिपिक बालाजी केंद्रे, पांडुरंग बोरकर,शेख खलील, सोमशेटवार, कैलास कुंटूरवार, राहुल सवाचमल यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी कोषागार कार्यालयात जावून श्री पडलवार यांचा सत्कार केला.
श्री प्रविण पडलवार यांची पदोन्नती झाल्यामुळे नांदेड जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे मॅडम,श्री पठाण,श्री सिताफुले,श्री शरद कपाळे,श्री मेश्राम इत्यादी मान्यवारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.