नांदेड(प्रतिनिधी)-बॉम्बे उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक समिर अडकर यांनी राज्यभरात 222 जिल्हा न्यायाधीश, 331 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, 472 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांना बदल्या दिल्या आहेत. तसेच 294 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांना पदोन्नती देवून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर करण्यात आले आहे.
राज्यभरात जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर अशा एकूण 1025 न्यायाधीशांना बदल्या देण्यात आल्या आहेत. त्यात नांदेड येथील जिल्हा न्यायाधीश सी.व्ही. मराठे हे बेलापूर ठाणे येथे जात आहेत. एस.पी.अग्रवाल हे ठाणे येथे जात आहेत. आर.आर.पटवारी नांदेड येथून मुंबईत अपघात प्राधिकरणात जात आहेत. कंधार येथील ए.एस.पाचभाई वरुड अमरावती येथे जात आहेत. भोकर येथील वाय.एम.एच.खराडी हे सी.टी.सिव्हील कोर्ट इंडोशी मुंबई येथे जात आहेत. यु.व्ही. इंदापुरे हे यवतमाळला जाणार आहेत.बिलोलीचे पी.ई.कोठाळीकर हे पनवेल येथे सहाय्यक धर्मदायक आयुक्त या पदावर जात आहेत.
नांदेडला येणारे जिल्हा न्यायाधीश पुढील प्रमाणे आहेत. भोकर येथे एम.एन.सलीम-मुंबई, एन.व्ही. शिंदे-वर्धा, यु.ए.मोरे-बिलोली नांदेड (नाशिक), एस.डी. तावशीकर-नांदेड(मुंबई), श्रीपाद देशपांडे-नांदेड(मुुंबई), प्रसाद कुलकर्णी-कंधार(खामगाव बुलढाणा), अमृता शिंदे-नांदेड (कुटूंब न्यायालय रायगड).
दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या बदल्यांमधील नांदेड येथून पाच न्यायाधीश दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत अणि पाच न्यायाधीश नांदेडला येत आहेत. नांदेड येथून जाणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर ए.के.मांडवगडे -प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मुंबई, के.पी.जैन देसरडा-पुणे ,डी.एम.जज-हिंगनघाट वर्धा, एम.आर.सोहावाणी-भिवंडी ठाणे, व्ही.जे.कोरे-औरंगाबाद. नांदेडला येणारे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर आर.के.गुजर-कंधार-नांदेड (वर्धा), एस.जे.गायकवाड-नांदेड(मंगरुळपिर वाशिम), शरद देशपांडे-विधीसेवा प्राधीकरण नांदेड(अहमदनगर), आर.यु.नागरगोजे-नांदेड(सोलापूर)
काही दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांना दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पदाच्या पदोन्नत्या देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये 16 नांदेड येथील आहेत. के.आर.कोंडारे, एस.ए.हरणे, आर.आर.पत्की, ए.एच.ठाकूर, ए.व्ही.डाकोरे, ए.बी.रेडकर, बी.एम.एन.देशमुख, राहुल शिंदे, व्ही.पी.उफाडे, ए.बी.जाधव, ए.डी.गोरे, एस.एल.येलडी, एन.व्ही.पवार, ए.जी.चव्हाण, एस.एल.वैद्य, पी.व्ही. चिद्रे.
बदल्या झालेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पैकी नांदेड येथून जाणारे 13 न्यायाधीश पुढील प्रमाणे आहेत. एस.एल.वैद्य-पुणे, व्ही.बी.चौधरी-आरमोरी, गडचिरोली, बी.एम.एन.देशमुख-नागपूर, क्यु.आर.सय्यद-कामठी नागपूर, एस.जी.ठाणेदार-उमरखेड यवतमाळ, बी.डी.माने-तळोदा नंदुरबार, व्ही.पी.उफाडे-वाशिम, ए.बी.जाधव-पुसद यवतमाळ, बी.एम.साखरे-दिग्रस यवतमाळ, ए.डी.गोरे-शाहदा नंदुरबार, आर.डी.माने- राळेगाव यवतमाळ, एस.एल.येलडी-संगमनेर अहमदनगर, आर.ए.एखतीब-उमरखेड यवतमाळ, एस.बी.ढेंबरे-भुसावळ यवतमाळ.
नांदेडला येणारे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर एस.डी.जाधव-सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड (चाळीसगाव जळगाव), एस.एम.कोळेकर-धर्माबाद नांदेड(महागाव यवतमाळ), बी.ए.अग्रवाल-माहुर नांदेड(भिवंडी ठाणे), एस.झेड.ए.कादरी-हिमायतनगर नांदेड(पुसद यवतमाळ),के.एस.कुलकर्णी – उमरी नांदेड(तुळजापुर उस्मानाबाद), डी.एस.निंबाळकर-नांदेड(चांदवड नाशिक), एम.पी.राठोड-नांदेड (नागपूर), के.बी.सोनवणे-नांदेड (सांगोला सोलापूर), पी.एम.कांबळे-मुदखेड नांदेड(रिसोड वाशिम), एम.आर.कायस्थ-नांदेड(सिंदखेडा धुळे), बी.एस.लाखोटे-सहकार न्यायालय नांदेड(अहमदनगर), शितल कौल-नांदेड(अमरावती), एस.जी. जाधव -हदगाव नांदेड(पुसद यवतमाळ), एन.बी.चव्हाण-लोहा नांदेड(मिरज सांगली).
वाचकांच्यासोयीसाठी अनुक्रमे 222 जिल्हा न्यायाधीशांच्या बदलीची पीडीएफ संचिका, 294 दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांच्या बदलीची संचिका, 331 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या बदलीची पीडीएफ संचिका आणि 294 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर ते दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अशी पदोन्नती झालेल्या बदलीची पिडीएफ संचिका अशा चार संचिका बातमीसोबत जोडत आहोत.
राज्यभरात 1025 जिल्हा न्यायाधीश, सी.जे.एस.डी. आणि सी.जे.जे.डी. यांंचे खांदेपालट
