अमेरिकन शेअर बाजाराला 3 दिवसात 430 लाख कोटींचा फटका ; जगात मंदींची नांदी

जगात टेरीफ वॉर अर्थात येणाऱ्या मंदीची चाहुल सर्वांनाच लागत आहे. गेल्या 72 तासामध्ये अमेरिकेतील शेअर मार्केटने 3 ट्रिलियन डालर अर्थात 430 लाख कोटी रुपये स्वाह झाले आहेत. भारताचा संपुर्ण शेअर बाजार 400 लाख कोटी डॉलरचा आहे. तरीपण टेरीफ वॉर सुरूच ठेवण्यात आले आहे. आता टेरीफ वॉरमधून अत्यंत सन्मानपुर्वक बाहेर जाण्याचा मार्ग डॉनॉल्ड ट्रम्प सुध्दा शोधत आहेत आणि भारतातील गोदी मिडीया ट्रम्प मैत्री निभावणार अशा बातम्या देत आहे. काही दिवसानंतर हेच गोदी मिडीया मोदीच्या मौनाला ट्रॅम्प भिला अशा बातम्या देतील. प्रश्न हा आहे की, आता भारतीय जनतेने काय करावे. कारण भारताला अमेरिकेने डटर्‌री 15 देशांच्या यादीत ठेवले आहे. तरी पण भारत सरकार त्यावर एक छोटेसे वक्तव्य सुध्दा देत नाही आणि अशा परिस्थितीत भारतीय जनतेने आपला पैसा सांभाळणे सर्वात महत्वपुर्ण बाब आहे.


मागील तीन दिवसामध्ये अमेरिकन शेअर बाजाराने 430 लाख कोटी रुपये गमावल्याची बातमी सीएनबीसी या वृत्तसंस्थेने दिली. फक्त अमेरिकाच नव्हे तर भारत, जर्मनी, जापान, फ्रान्स या सर्वच देशामध्ये शेअर मार्केट खाली चालले आहे. ही परिस्थिती सर्व जगभर सुरू आहे आणि मंदी आलीच तर काय होईल आज आणि उद्या सुट्टी आहे. सोमवारी हीच परिस्थिती शिल्लक राहिली तर जगात मोठ्या प्रमाणात मंदी येणार हे सुनिश्चित झाले आहे. एफटीएसटी 4.95 टक्के, जापान, 2.4 टक्के, जर्मनी 4.9 टक्के नास्टाक 5.82 टक्के अशा पध्दतीने शेअर खाली पडलेले आहेत. भारताची सुध्दा हीच परिस्थिती आहे. डिसेंबर ते एप्रिल या दरम्यान अमेरिकेचा आयटी सेक्टर 20 टक्के खाली आला आहे. असे कोविड काळात सुध्दा घडले नव्हते. याचा अर्थ भयंकर मंदी येणार आहे. एलेन मस्कच्या टेक्सला ही कंपनी सुध्दा 60 टक्के खाली आहे. म्हणजे संपुर्ण जग विध्वंसाकडे जात आहे असेच म्हणावे लागेल.


दोन सांड भांडतात तेंव्हाची परिस्थिती आपण पाहतो. तेंव्हा त्यांचे काही बिघडत नाही. पण आसपासच्या वस्तु, व्यक्ती यांना नुकसान होते. हे दोन सांड म्हणजे अमेरिका आणि चिन आहेत. डोनॉल्ड ट्रम्प हे प्रत्येक राष्ट्राध्यक्षाला आपल्या घराचा गडी आहे असे बोलतो. परंतू टेरिफ वॉर तयार करून त्याने स्वत:ची कबर सुध्दा खोदली आहे. आता तो आदरणीय पध्दतीने यातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधत आहे. 10 टक्के बेसलाईन टेरीफ आणि 26 टक्के इतर टेरिफ असा 36 टक्के टेरीफचा धसका त्याने दिला आहे. त्यामुळेच अमेरिकेसह जगाच्या शेअरमार्केटचे संतुलन बिघडले आहे. इजरायल, व्हीयतनाम आणि भारत हे तीनच देश असे आहेत जे अमेरिकेविरुध्द बोलत नाही. नाही तर कॅनॉडा सुध्दा त्यांच्याविरुध्द बोलत आहे. आणि डोनॉल्ड ट्रम्प शिजिनपिंग आणि पुतीन यांच्याशी ट्रॅम्प पंगा घेत नाही आणि सोबतच किंमजोंगशी घेत नाही. कारण तो त्याच्या पुढचा आहे. पण जी मंडळी बोलत आहे. त्यांच्याविरुध्द ट्रॅम्पचा मुलगा सुध्दा आता बोलायला लागला आहे. तो असे जगाला सांगतो की, जो पहिला येवून बोलेल. तो फायद्यात राहिल. जो शेवटी आला त्याचे नुकसान होईल. एरेन ट्रॅम्प हा डोनॉल्ड ट्रम्पची कार्बन कॉपी आहे. तो जगाला सांगतांना असे सांगतो की, हा चित्रपट मी 41 वर्ष पाहत आहे. म्हणजे तो जगाला भिती दाखवत आहे.
खरे तर हा टेरीफ वॉर 9 एप्रिल 2025 पासून अंमलात येणार होता. तो अंमलात येण्याअगोदरच जगातील शेअर मार्केटची गंभीर अवस्था पाहिली असता अत्यंत वाईट परिस्थिती दिसत आहे. भारत देशाच्या संपुर्ण शेअर मार्केटपेक्षा 30 लाख कोटी रुपये अमेरिकन शेअर मार्केटने गमावले आहेत. फोर्स-1 या आपल्या विमानात बसून पत्रकारांशी बोलतांना ट्रॅम्प म्हणत आहे की, आम्हाला सर्व देशांचे फोन आले. आम्ही यावर विचार करत आहोत. तसेच आम्ही ड्रायव्हींग सिटवर आहोत. हे वक्तव्य सुध्दा जगाला भिती दाखवणारे आहे. पण भित कोण आहे. इजरायल त्यांचाच पिट्टू आहे. व्हियतनाम एकदम छोटा देश आहे. त्यांच्या बोलण्या आणि न बोलण्याने काय फरक पडतो.
अमेरिका भारताला डम्पींग यार्ड करू इच्छीते. त्यांनी आम्ही हे देणार असे म्हणतात. पण मागितले कोणी आणि भारताचे पंतप्रधान काहीच न म्हणता परत आलेले आहेत. त्याचे उदाहरण वाचकांसाठी सोप्या भाषेत असे आहे की, भारतात मासांहार करणारे व्यक्ती कोंबडीच्या तंगडीला पसंत करतात. पण अमेरिकेमध्ये तंगडी कोणी खात नाही. आता ती तंगडी सुध्दा भारतात निर्यात होईल. मग आमच्या देशातील कोंबडी उद्योगाचे काय होईल. याचा विचार होण्याची गरज आहे. आपण विचार करू की, टेरीफ कमी होईल. नव्हे तर तो करावाच लागेल. तरच अमेरिकेची अर्थव्यवस्था टिकेल. विचार करा. 36 पैकी 26 टक्के टेरीफ कमी झाला आणि 10 टक्केच राहिला तरी पण भारताचे अतोनात नुकसान होणार आहे आणि भारतावर खरेदीसाठी केली जाणारी अमेरिकेची जबरदस्ती अशी होईल की, ट्रॅम्पच्या शर्तींवर आम्ही आमचा डंका वाजवायला लागलो तर आमचा डोल फाटणारच आणि टेरिफ कमी झाल्यानंतर गोदी मिडीया सांगणार मोदीच्या मौनाला ट्रॅम्प भिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!