नांदेड (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे हे विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवेत तत्पर असतात, त्यांच्या या कार्याबद्दल माजी राज्यमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी अपडेट समुहाच्या, राजकीय क्षेत्रातील मराठी अपडेट युथ आयकॉन पुरस्काराने बंटी लांडगे यांना सन्मानीत करण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गोरगरीब रूग्णांसाठी मोफत रूग्णवाहिका, अनाथ व निराधारांना नेहमीच मदतीसाठी ते पुढाकार घेत असतात. स्वखर्चातून नागरिकांची तहान भागविण्यासाठी शहरामध्ये बर्याच ठिकाणी बोअर पाडले आहेत. पावसाळ्यामुळे गोदावरी नदीकाठावरील भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. या पुर बाधितांच्या मदतीसाठी बंटी लांडगे मदतीसाठी धावून येत अन्नदान व धान्य किट वाटप केले आहेत. लॉकडाऊन काळात मास्क, सॅनिटायझर वाटप यासह रमजान ईदनिमित्त सर्व धर्मगुरूंना कार्यक्रम घेवून एकतेचा संदेश देत असतात. यावर्षी ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध देखाव्यासह लक्षवेधी अशी मिरवणूक त्यांच्या नेतृत्वखाली काढण्यात येते. अशा विविध कार्याची दखल घेत मराठी अपडेटच्या वतीने अभिजात मराठी उत्सव, राजकीय मान्यवरांचे काव्यवाचन हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम सोमवार (ता.३१) रोजी मिनी सह्याद्री सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे यांना, राजकीय क्षेत्रातून मराठी अपडेट युथ आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर, काँग्रेसचे यशपाल भिंगे, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद, भाजपा प्रवक्ते संतोष पांडागळे, माजी उपमहापौर आनंद चव्हाण, काँग्रेस प्रदेश सचिव सुरेंद्र घोडसकर, संजय शेळगावकर, काँग्रेस कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे, कार्यक्रमाचे आयोजक, काँग्रेस प्रवक्ते तथा मराठी अपडेटचे संस्थापक बापूसाहेब पाटील आदीजन उपस्थित होते. या यशाबद्दल बंटी लांडगे यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.