नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 39 ठिकाणी छापे मारुन दहा गुन्हे दाखल केले आहेत आणि 65 हत्यारे जप्त केली आहेत.
शहरात अवैध शस्त्रे बऱ्याच ठिकाणी, अनेक युवकांकडे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळेच गुन्ह्यांचे प्रमाण सुध्दा वाढत आहे. याला लक्ष करून पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी 39 ठिकाणी छापे मारले. 10 ठिकाणी कार्यवाही करून शस्त्रअधिनियमाप्रमाणे 10 गुन्हे दाखल केले. त्यात 65 हत्यारे सापडले आहेत. त्यामध्ये तलवारी, कोयते, कुऱ्हाडी असे साहित्य सापडले. त्या ठिकाणी अवैध पणे तलवार व खंजीर बनविण्याचा कारखानाच होता. तेथे छापा मारुन हे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी राबवलेल्या कोम्बींग ऑपरेशन दरम्यान एक चार चाकी वाहन आणि सहा दुचाकी गाड्या पकडल्या आहेत. त्या सर्व गाड्या चोरीच्या असल्याचा संशय असल्याने त्याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 124 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच रात्रीच्या अंधारा फायदा घेवून चोरी करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या एका व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 122 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.