दोन खंडणीखोरांना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-खंडणी मागणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेने 12 तासात पकडून त्यांना गाजाआड केले आहे.
सोहम सुर्यकांतराव खानापुरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.28 मार्च रोजी डी मार्टजवळ, चाय वे या दुकानाजवळ असतांना सौरभ उर्फ दिपक टाकळीकर (26) रा.शिवशक्तीनगर कलामंदिरजवळ नांदेड आणि योगेश गंगाधर गुडूप (23) रा.ओमकारेश्र्वर नगर तरोडा (खु) या दोघांनी त्यांना पहिले सुध्दा अनेकवेळेस मारहाण केली आणि पुन्हा मारहाण न करण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यकपोलीस निरिक्षक विठ्ठल घोगरे, पोलीस उपनिरिक्षक हरजिंदरसिंघ चावला, पोलीस अंमलदार राजू बोधगिरे, शेख इजरायल, अनिल बिरादार, साहेबराव कदम, अकबर पठाण, विठ्ठल वैद्य संतोष पावडे, दिपक ओढणे यांनी या दोन आरोपींचा शोध घेवून 12 तसात गजाआड केले आहे. पुढील तपासासाठी या दोन जणांना भाग्यनगर पोलीसांच्या स्वाधनी करण्यात आहे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!