नांदेड (प्रतिनिधी)- मुखेड येथील स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखेतून एका शेतकऱ्याचे 50 हजार रूपये कोणीतरी चोरट्यांनी चोरले आहेत.
नारायण रूपला पवार रा. काळूतांडा ता. मुखेड हे 28 मार्च रोजी 12.28 वाजेच्या सुमारास स्टेट बॅंफ इंडिया शाखा मुखेड येथे पैसे भरण्यासाठी गेले असताना त्यांच्या पिशवीतील 50 हजार रूपये रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.मुखेड पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा क्र. 59/2025 दाखल केला आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस अंमलदार गोठे करीत आहेत.
मुखेड एसबीआय बॅंकेत चोरी
