भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर संजय जोशी यांची नियुक्ती व्हावी या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यापूर्वी न झालेली आठवण पंत प्रधान नरेंद्रजी मोदी यांना झाली आहे.याच कारणास्तव, ३० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी नागपूरच्या आरएसएस मुख्यालयात येणार आहेत. त्या दिवशी काय होईल, हे सांगता येणार नाही, परंतु संघ संजय जोशी यांच्या नावावर ठाम असल्याचे दिसत आहे. मात्र, नरेंद्रजी मोदींना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजय जोशी यांच्या हातात असावेत, असे वाटत नाही.
“उलटा चष्मा” या चॅनलचे चंद्रकांत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्ती बाबत माहिती दिली आहे. आरएसएसच्या म्हणण्यानुसार, त्यांना अध्यक्षपदासाठी संजय जोशी यांचेच नाव हवे आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक दरवर्षी होत असते आणि यंदा या बैठकीला 1500 लोक उपस्थित होते. संघाच्या विनंतीनंतर सात वेळा अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा टाळण्यात आली आहे. आम्ही वाचकांसमोर ही माहिती सादर करत असताना देखील, या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की, गुढीपाडव्यानंतरच्या नवरात्र महोत्सवात, म्हणजेच एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, नवीन अध्यक्षपदाचे नाव निश्चित होईल.
संघाच्या गोटात संजय जोशी यांचे नाव नवीन नाही. 63 वर्षांचे संजय जोशी उच्चशिक्षित असून, तरुणपणापासूनच संघाचे कार्य करीत आहेत. एकेकाळी नरेंद्रजी मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्रीपद संजयजी जोशी यांच्यामुळे मिळाले नाही, असे बोलले जाते. मोदी आणि जोशी यांच्यात मतभेद निर्माण झाले, परंतु राजकारणात असे मतभेद कायम टिकवता येत नाहीत.
संजयजी जोशी जर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले, तर पक्षातील हुकूमशाही संपुष्टात येईल. कोणत्याही राज्यात कुणालाही संधी मिळू शकेल. सध्या पक्षात जो वातावरण आहे, ते बदलू शकतात. मात्र, सत्ता संजयजी जोशी यांच्या हातात जाणे नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांना नको आहे. म्हणूनच आजपर्यंत अध्यक्षपदाच्या नावावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
11 वर्षांनंतर नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची आठवण झाली का? हा केवळ योगायोग नाही तर त्यामागे राजकीय गणित आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशिवाय भारतीय जनता पक्षाचा देशात किंवा राज्यांमध्ये विस्तार करणे कठीण आहे.
यापुढे, नरेंद्रजी मोदी यांच्यानंतर भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असावा, याविषयी चर्चा होईल असे वाटते. अमित शहा, योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह किंवा नितीन गडकरी हे पर्याय म्हणून समोर येतात. आमच्या मते, अध्यक्षपदाच्या नावावर संजय जोशी यांच्या नावाला संमती मिळण्याची 99% शक्यता नरेंद्रजी मोदी यांच्यावतीने नाकारत्मकता दिसेल.
नितीन गडकरी म्हणाले होते की, जनता जातीयवादी कधीच नसते नेते जातीयवादी असतात त्यांना इंडिया गटबंधन कडून पंतप्रधान पदाची ऑफर होती हेही सांगितले होते हे संदेश कोणासाठी आहे अर्थात बीजेपी पार्टीमध्ये अंतर्गत वाद आहेत हे नक्कीच येत्या 30 तारखेला हे वाद सुरु राहतील किंवा संपतील किंवा नवे वाद तयार होतील हे आपल्याला कळण्यासाठी फक्त 5 दिवसच शिल्लक आहे