नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने हिंगोली जिल्ह्यातील दोन आणि अर्धापूर तालुक्यातील एक अशा तिन चोरट्यांना पकडून त्यांनी चोरलेली एक दुचाकी, मोबाईल, टी.व्ही., रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 4 लाख 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरट्यांना पकडल्यामुळे भाग्यनगर, पोलीस ठाण्यातील दोन आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील एक असे तिन चोरीचे गुन्हे घडकीस आले आहेत.
नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या विभागातील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, गणेश लोसरवार, तिरुपती तेलंग, सुधाकर देवकत्ते यांना कामगिरीवर पाठवितांना कॅनॉल रोड येथे पाठविले. उदय खंडेराय यांच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने तेथे सतनामसिंघ गुरमुखसिंघ चव्हाण (35) रा.मोंढा रेल्वे स्थानक रोड वसमत जि.हिंगोली, रमेश सुरेश गायकवाड (36) रा.गणेशपुर वसमत जि.हिंगोली आणि संतराम रघुनाथ सरोदे (27) रा.तालाबगल्ली अर्धापूर जि.नांदेड अशा तिघांना ताब्यात घेतले. नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा क्रमांक 653/2024, 39/2025 आणि नांदेड ग्र्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 126/2025 या तिघांनी घडविला असल्याची माहिती मिलिंद सोनकांबळे यांना प्राप्त झाली. या चोरट्यांकडून काही सोन्या-चांदीचे दागिणे, एक दुचाकी गाडी, एक मोबाईल, एक टी.व्ही. आणि 22 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 4 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आपल्या अहवालासह पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी या तिन चोरट्यांना भाग्यनगर पोलीसांच्या स्वाधीन केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने तीन चोरट्यांना पकडून 4 लाखांचा ऐवज जप्त केला
