हाडामासाची माती झालेल्या औरंगजेबच्या कबरीची भीती साडेतीनशे वर्षानंतर कुणाला वाटू लागली?

हाडामासाची माती झालेल्या औरंगजेबाच्या कबरीची भीती आज साडेतीनशे वर्षानंतर कुणाला वाटू लागली? राजापूरच्या मशिदीत भोळी भाबडी माणसं घुसविणारा कोण? आणि घुसविणाऱ्याचा बाप कोण? आणि या बापांना काय हवय?

जातीय दंगलीचा मोठा इतिहास नसलेल्या नागपूर मध्ये सामान्य लोकांना भडकावून औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात मोठा संघर्ष झाल्याचे पहायला मिळाले. “औरंगजेबाच्या कबरी विरोधी मी सुद्धा आहे पण केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षण आहे त्यामुळे राज्य सरकार हतबल आहे” अशा आशयाचे वक्तव्य खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे ऐकले. म्हणजे कबर उखडून टाकावी अशी जाहीर इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

सेक्युलर, सर्व धर्म समभाव पाळणारा अशा त्या शांत कोकणातील राजापूरच्या मशिदीमध्ये मोठा जमाव घुसत होता व पोलीस हतबल झालेले दिसत होते. माझ्या पोलीस नोकरीची सुरुवातच कोकणातून झाली होती. त्या अगोदर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील एका गावात वर्षभर नोकरी साठी राहिलो होतो. कोकणची माणसं खरंच साधी भोळी. मग ती एवढी आक्रमक कशी झाली?

राजापूरच्या मशिदीत घुसणारी तसेच औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी रस्त्यावर आलेली सर्व माणसे खरोखरच मोठी गुन्हेगार असतात काय? ती तशी का वागतात व त्यांना पोलीस दल परावृत्त करू शकते का? याबद्दल मी केलेला प्रयोग समजून घेता येईल.

1991 साल असावे. त्यावेळी मी भिवंडीचा उपायुक्त होतो. रात्री अकराच्या सुमारास मुंबई कंट्रोल वरून फोन आला. गणपती मिरवणूक कुठपर्यंत आली व परिस्थिती कशी आहे. भिवंडी कंट्रोल रूम अधिकाऱ्याने निरोप दिला की मिरवणूक साडेनऊ वाजता संपली. मग पोलीस महासंचालक तुमच्याशी बोलणार आहेत असा मेसेज आला. मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितले की मिरवणूक साडेनऊ वाजता संपली. लोक आपापल्या घरी गेलेत. ये कैसा हुआ? हमेशा तो भिवंडी की मिरवणूक सुबह 12 बजे खतम होती है याने बीस घंटे चलती है और इस टाइम सिर्फ साडेपाच घंटे मे …..?

आणि ते खरे होते. त्या घटनेच्या तीन वर्षे अगोदर पासून आम्ही भिवंडी मध्ये ‘एक दिवस तुमचा बाकी दिवस आमचे’ हा प्रयोग प्रत्येक हिंदू ,मुस्लिम, बौद्ध,

यांच्या मिरवणुकीच्या दरम्यान राबवित होतो. बऱ्याचदा एका धर्माच्या मिरवणूकी मध्ये दुसऱ्या धर्माच्या विरुद्ध घोषणा दिल्या जातात. अंगविक्षेप केला जातो. दारूच्या नशेत हिडीस नाच केला जातो. धर्मस्थळावर रंग फेकला जातो. मिरवणूक जास्त काळ रेंगाळत ठेवली जाते. त्यातून दोन्ही समाजात तणाव वाढतो. पुढे दंगली होतात. पण पोलिसांनी त्यावेळी गैर कृत्य करणारा विरुद्ध कारवाई केली तर मिरवणूक थांबविली जाते व कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी

‘एक दिवस तुमचा बाकी दिवस आमचे’

ही योजना राबविली होती. असे खोडसाळ कृत्य करणाऱ्या माणसाचे फक्त नाव लिहून घेतले जाई व सण संपल्यानंतर त्याला पोलीस स्टेशनला बोलावून त्याचे विरुद्ध अगदी साधी कारवाई केली जाई.असे लोक कोर्टात छोटी रक्कम भरून बाहेर येत व पोलिसांनी आमचे काय वाकडे केले असे म्हणत. पण ही योजना तिथेच थांबत नसे. एकदा पकडलेला इसम पुढच्या प्रत्येक सणाच्या वेळेला पोलीस स्टेशनला बोलावला जाई व त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई केली जाई. असे बोलावणे व कारवाई करणे सतत चालू राही. त्यामुळे आपण एकदा पकडले गेलो की पोलिसांच्या ब्लॅक लिस्टमध्ये जातो हे त्यांच्या व त्यांच्या गल्लीतील अनेक लोकांना समजत असे त्यामुळे इतरांच्या वर मोठे दडपण येत राही.

सुतार आळीतील गणपती मंडळापुढे फटाक्याची माळ लावली होती. एसीपी तेरदाळकर यांनी ती पायातील बुटाणे विझविली. या कृत्यामुळे ‘आमच्या भावना दुखावल्या ‘ असे म्हणत संपूर्ण मिरवणूक थांबवण्यात आली. त्यांनी मागणी केली की जोपर्यंत तेरदाळकर माफी मागत नाहीत तोपर्यंत मिरवणूक सुरू करणार नाही. मी दुसऱ्या टोकाला होतो ‘तेरदाळकर यांनी माफी मागावी’ असा मी वायरलेस वरून आदेश दिला. त्यांनी तसे केले. पण तरीही मिरवणूक सुरू झाली नाही.त्यांनी सांगितले की पोलीस उपायुक्त म्हणजे मी माफी मागावी. मी घटनास्थळी गेलो आणि माफी मागितली. ती पोरं म्हटली की तोंडी नको लेखी माफी मागावी. आमचे अधिकारी व पोलीस यांना ते मान्य नव्हते.यांना मी सांगितले की आपली योजना आहे की एक दिवस तुमचा म्हणजे या आंदोलकांचा आणि बाकी दिवस आमचे म्हणजे पोलिसांचे. मी लेखी माफी मागितली आणि मिरवणूक सुरू झाली .पण नंतर या दोन पोरांना नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट खाली अटक करून सहा महिने जेलमध्ये कुजविले!

अकोला येथे गुलाबराव गावंडे यांचे गणेश मंडळ मशिदीसमोर अमर्याद काळ धागडधिंगा घालत असे त्यांना मी पंधरा मिनिटांची वेळ दिली होती .पण त्यांनी दहा व्या मिनिटाला आपला गणपती हटविला होता! अशा असंख्य घटना.

धार्मिक मिरवणुकामध्ये एकदा गैरकृत्य करताना आढळला की त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक सणांमध्ये त्याला पोलीस स्टेशनला बोलवून त्याचे विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करणे यालाच एक दिवस तुमचा बाकी दिवस आमचे अशी योजना म्हणतात. तीन वर्षाच्या काळात अशा पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासली असता ती सगळी सामान्य पोरे होती.ते कोणी फार हार्डन क्रिमिनल नव्हते. जातीयवादी नेत्यांनी केलेल्या चिथावनी खोर प्रचाराचे ते बळी होते. या योजनेद्वारे एका बाजूला चिथावणीखोर प्रचारातून निर्माण केला जाणारा जातीय उन्माद दाबण्याचे काम आम्ही केले आणि दुसऱ्या बाजूला

हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये संवाद निर्माण करणारा व त्यातून मोहल्ला पातळीवर सर्वांगीण विकास करणारा ‘मोहल्ला कमिटी’ हा प्रयोग राबविला होता.

त्या काळात आणि नंतर ही काँग्रेस-राष्ट्रवादी चे सरकार होते पण त्यांनी हे प्रयोग स्वीकारले नाही अगर त्याची नोंदही घेतली नाही. आता त्यांच्यावर चने फुटाणे खाऊन गुजरान करायची वेळ आलेली आहे. कोकणातील राजापूर सारख्या शांत भागामध्ये हिंदू लोक मशिदीमध्ये घुसतात कायदा धाब्यावर बसवतात यामागे शक्ती कोणती? औरंग्याची कबर हटविण्यासाठी जमलेले तसेच मशिदीमध्ये घुसलेल्या 99% लोकांचा पूर्णपणे हेतू मशीद अगर मुस्लिम विरोधी नसतो. ते इतरांनी केलेल्या प्रचाराचे बळी असतात. कोकण भागातील नितेश राणे नावाचा लोक प्रतिनिधी ‘आम्हाला मतदान केले नाही तर ग्रामपंचायतीचे अनुदान बंद करेन’ अशी जाहीर धमकी देतो. धर्मस्थळामध्ये घुसून अल्पसंख्यांकांना धडा शिकवू. पोलिसांना धडा शिकवू .आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. आमचा बाप सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे. अश्या आशयाचे उद्गार त्यांनी जाहीरपणे काढल्याचे ऐकण्यात आले. हेच नितेश राणे एकेकाळी आपल्या सागर बंगल्यावरील बापाला म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या सहकार्यांना अर्धी चड्डीवाले म्हणून हिनवत होते. ‘आम्ही मराठे 32% आहोत व ते ब्राह्मण अडीच टक्के आहेत तरी ते आमची मारतात. बाबा पुरंदरे व ब्राह्मण हे भडवे आहेत.’ अश्या आशयाचे म्हटल्याचे युट्युब वर ऐकण्यात आले.

कोकणातील राणे, कदम, सावंत, तावडे,…, ही तालेवार मराठा घराणी. शोधून काढले तर ते आमचे दूरचे नातेवाईकही निघतील. ही व इतर मराठा घराणे स्वतःला इतर कुणबी मराठ्यांना आपल्यापेक्षा हलके समजतात पण तिकडे मात्र ब्राह्मणांना आपला बाप मानून त्यांची धोतरं धूत बसतात.

नितेश राणे व इतर तालेवार मराठा म्हणवून घेणाऱ्याच्या पूर्वजांची सुद्धा हे दोन टक्के ब्राह्मण अशीच मारीत होते. त्यावेळी स्वतःचे पोट भरावे यासाठी या ब्राह्मणांनी कर्मकांडे लिखित स्वरूपात तयार केली आणि ती पाळली नाही तर तुमच्या घरात रोगराई, आजार ,दारिद्र्य एवढेच नव्हे तर तुमच्या पिढ्या नष्ट होतील अशी भीती घातली आणि त्या भीतीपोटी हे ब्राह्मण राज्य करत राहिले. एवढेच नव्हे तर या तालेवार मराठा घराण्याचे बाप/ मूळ पुरुष हे ब्राह्मण होते असे याच ब्राह्मणांनी संस्कृतमध्ये धर्मग्रंथाच्या नावाखाली लिहून ठेवले. राणे घराण्याचा जमदग्नी हा ब्राह्मण ऋषी मूळ बाप आहे तर खोपडे घराण्याच्या वाट्याला कश्यप ऋषी नेमून दिला.परशुरामाने सर्व पृथ्वी नीक्षत्रिय केल्यावर त्यांच्या बायकांशी संभोग एकूण 115 ब्राह्मण ऋषींनी करून ही प्रजा निर्माण केली. आणि हे मराठे आजही हे आपले गोत्र म्हणून सर्वत्र अभिमानाने मिरवतात. मला हे कळाल्यावर मी कणकेचा कश्यप ऋषी बनविला आणि उकिरड्यात पुरला.

मी व्यक्तिशः स्वतःला मराठा समजत नाही कारण अभ्यासांती समजले कि ती बामणांनी दिलेली एक शिवी आहे. समता पाळणारा वारकरी भागवत धर्म मी मानतो. कसे ते मी मागच्या लेखात लिहिलेले आहे.आजचे शिकले सवरलेले मराठा म्हणून घेणाऱ्यांना कर्मकांडातील फोलपणा समजला. नितेश राणेंना देखील समजला. तरीपण एवढी लाचारी का? त्यांचे पिताश्री नारायणजी राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या पार्टीला देशातील भ्रष्ट पार्टी म्हणून दुषणे देत होते. मग त्यांचे सागर बंगल्यावरील देवेंद्र फडणवीस बद्दलचे प्रेम का उफाळून आले असावे बरे?

नितेश राणे यांचा खरा बाप( biological father) नारायण राव हे महत्त्वकांक्षी, अभ्यासू, प्रशासनावर पकड असलेले असे नेते आहेत. ते मुख्यमंत्री असताना मी पोलीस दलात होतो. पण ती क्षमता त्यांनी फक्त आणि फक्त माया कमावण्यात वापरलेली असावी असे दिसते. ती वाढवण्यासाठी त्यांना अनेक पक्षात उड्या घ्याव्या लागल्या. राणे पिता पुत्रांची अफाट मालमत्ता असली तरी उरलेल्या आयुष्यात त्यांची गरज किती? एका दिवसात तीन वेळा जेवण करतील.बाहेर पडताना एकावेळी एकच पॅन्ट, एक शर्ट व एक ब्लेजर घालतील. सात मजल्याची बिल्डिंग असेल तरी एका वेळी एकाच मजल्यावर,एका मजल्या वरील एकाच खोलीत, खोली शंभर फूट बाय 100 फूट आकाराची असली तरी तीन बाय सहा फुटाच्या एकाच खाटेवर झोपतील.आणि एकूण आयुष्य 100 वर्षापेक्षा जास्त असणार नाही. शिकंदराप्रमाणे खाली हात आया था खाली हात जायेगा हे सत्य त्यांनाही लागू आहे. मग यांनी क्षत्रिय मराठा शिवराय यांना बदनाम करत सागर बंगल्यावर बसलेल्या,थडग्यात माती होऊन पडलेल्या औरंग्या पेक्षा जास्त क्रूर व खुनशी असलेल्या देवेंद्र फडणवीस नावाच्या अर्ध्या चड्डी वाल्याला आपला बाप का समजावा?

याचे उत्तर मानव वंश शास्त्रात आढळते. सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वज युरेशियातून भारतात आले त्यांनी नितेश राणे व सर्व मूळनिवासींच्या पूर्वजांना गुलाम केले व कर्मकांडाद्वारे त्यांची गुलामी घट्ट बनविली. राज्यघटना आली. बहुसंख्यांकाच्या जोरावर गुलामांच्या पोरांनी सत्ता ताब्यात घेतली पण किती लुटायचे व लुटलेले कसे पचवायचे याचे ज्ञान त्यांच्याकडे नसल्याने राज्यघटनेतील दोष हेरून देवेंद्रजीच्या पिढीने नितेशच्या पिढीला जेलची भीती दाखवली. या ब्राह्मणांना एकेकाळी भडवे म्हणणारे नितेश राणे व त्याचे वडील याच ब्राह्मणांची धोत्र धुवायला लागले.

उपाय काय? अशीच अवस्था जपान मध्ये होती. सामुराई जमातीचे पाच टक्के असलेले लोक हातात शस्त्र घेऊन स्वतःला श्रेष्ठ समजत इतरांचे शोषण करत होते. तिथे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास ‘माजी’ क्रांती झाली. सामुराई जमातीने पुढाकार घेऊन आपली शस्त्र खाली ठेवली व सर्व समाज एका पातळीवरती समान झाला. आपल्याकडे दोन क्रांत्या झाल्या.

देशाला स्वातंत्र्य ही पहिली क्रांती. राज्यघटना ही दूसरी क्रांती. पण मनुस्मृति वर आधारित ब्राह्मणांची मालक जमात master race शाही नष्ट झाली नाही. मिडिया,साहित्यिक, न्यायव्यवस्था, नोकर शहा, सामाजिक चळवळी, धार्मिक क्षेत्र यातील सगळे ब्राह्मण एकत्र आलेत. ब्राह्मणी वर्चस्व असलेली वर्णव्यवस्था व त्यातून केले जाणारे शोषण हे कायम राहावे यासाठी संघटितपणे उघड व गुप्त प्रयत्न करीत आहेत. तथाकथित देश प्रेमी ब्राह्मणांनी पुढाकार घेऊन वर्ण व्यवस्था कालबाह्य आहे हे जाहीर करून समता आणण्यासाठी पुढाकार घ्यावा.ते तसे होत नसेल तर लोकशाही मार्गाने या ब्राह्मणी शक्ती विरुद्ध आवाज उठविला पाहिजे. त्यासाठी राज्यघटनेमध्ये सुधारणा आणण्यासाठी तिसरी क्रांती सुरू करावी लागेल असे माझ्यासारख्या सामान्य माणसाला वाटते.

ते अवघड आहे पण अशक्य मुळीच नाही. सुरेश खोपडे.

संदर्भ: माझे पुस्तक ,

तिसरी क्रांती

+919503031699

(पुस्तक वाला भाई)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!